फोर्ड मोटर कंपनी

फोर्ड मोटर कंपनी ही एक प्रवासी मोटार गाड्यांचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. फोर्डचे मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहराच्या डियरबॉर्न ह्या उपनगरामध्ये आहे. हेन्री फोर्ड ह्या अमेरिकन उद्योगपतीने जून १९०३ मध्ये फोर्डची स्थापना केली. एकूण कार विक्रीच्या बाबतीत फोर्ड ही जगातील चौथी मोठी कंपनी (टोयोटा, जनरल मोटर्सफोक्सवॅगन ह्या पहिल्या तीन कंपन्या) आहे.

फोर्ड मोटर कंपनी
प्रकारसार्वजनिक
उद्योग क्षेत्रप्रवासी मोटार कार
स्थापनाजून १६, १९०३
संस्थापकहेन्री फोर्ड
मुख्यालयडियरबॉर्न, मिशिगन, Flag of the United States अमेरिका
महत्त्वाच्या व्यक्तीऍलन मुलाली
महसूली उत्पन्न१४६ अब्ज डॉलर्स
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
३० अब्ज डॉलर्स
कर्मचारीअंदाजे २.१३ लाख
संकेतस्थळफोर्ड.कॉम