बेलीझ


बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.

बेलीझ
Belize
बेलीझचा ध्वजबेलीझचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "Sub Umbra Floreo" (लॅटिन)
राष्ट्रगीत: Land of the Free

शाही राष्ट्रगीत: गॉड सेव्ह द क्वीन
बेलीझचे स्थान
बेलीझचे स्थान
बेलीझचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीबेल्मोपान
सर्वात मोठे शहरबेलीझ सिटी
अधिकृत भाषाइंग्लिश
सरकारसंविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही
 - राणीएलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधानडीन बॅरो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस२१ सप्टेंबर १९८१ 
क्षेत्रफळ
 - एकूण२२,९६६ किमी (१५०वा क्रमांक)
 - पाणी (%)०.७
लोकसंख्या
 -एकूण३,४०,८४४ (१७३वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण२.९९९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न८,७५३ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७३२ (उच्च) (८४ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलनबेलीझ डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी−०६:००
आय.एस.ओ. ३१६६-१BZ
आंतरजाल प्रत्यय.bz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक५०१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इ.स. पूर्व काळामध्ये माया संस्कृतीचा भाग असलेल्या बेलीझमध्ये १६व्या शतकात स्पॅनिश शोधक पोचले. येथे अनेक वर्षे ब्रिटिश व्यापारी व वसाहतकार वास्तव्यास होते. १९व्या शतकामध्ये मध्य अमेरिकेमधील स्पॅनिश राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण बेलीझवर ताबा मिळवला. १८६१ साली बेलीझ ही ब्रिटिश साम्राज्याची एक वसाहत बनवली गेली व तिचे नाव बदलून ब्रिटिश होन्डुरास असे ठेवण्यात आले. १९७३ साली ह्या वसाहतीचे नाव बदलून पुन्हा बेलीझ ठेवण्यात आले व २१ सप्टेंबर १९८१ रोजी बेलीझला स्वातंत्र्य मिळाले. सध्या बेलीझ राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक राष्ट्राध्यक्षपद आहे.

विभाग

बेलीझ देश सहा जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. यातील बेलीझ जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक नाही.

जिल्हाप्रशासकीय केन्द्रक्षेत्रफळ[१]लोकसंख्या
(२०१५)
बेलीझबेलीझ सिटी१,६६३ चौ. मैल (४,३१० चौ. किमी)१,१०,६४४
कायोसान इग्नासियो२,००६ चौ. मैल (५,२०० चौ. किमी)८७,८७६
कोरोझालकोरोझाल टाउन७१८ चौ. मैल (१,८६० चौ. किमी)४५,५३०
ऑरेंज वॉकऑरेंज वॉक टाउन१,७९० चौ. मैल (४,६०० चौ. किमी)४९,४६६
स्टान क्रीकडॅंगिरिगा९८६ चौ. मैल (२,५५० चौ. किमी)३९,६९५
टोलेडोपुंता गोर्दा१,७०४ चौ. मैल (४,४१० चौ. किमी)३४,९२८

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: