यवतमाळ जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.

यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे.[१] यवतमाळ शहर हे जिल्ह्याची राजधानी आहे.पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत.

यवतमाळ जिल्हा
यवतमाळ जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
यवतमाळ जिल्हा चे स्थान
यवतमाळ जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावअमरावती विभाग
मुख्यालययवतमाळ
तालुकेउमरखेडझरी जामणीघाटंजीआर्णीकेळापूरकळंबदारव्हादिग्रसनेरपुसदबाभुळगावयवतमाळ तालुकामहागांवमारेगांवराळेगांववणी
क्षेत्रफळ
 - एकूण१३,५८४ चौरस किमी (५,२४५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण२७,७५,४५७ (२०११)
-लोकसंख्या घनता२०४ प्रति चौरस किमी (५३० /चौ. मैल)
-साक्षरता दर८०.७%
-लिंग गुणोत्तर१.०५५ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीडॉ पंकज आशिया
-लोकसभा मतदारसंघयवतमाळ-वाशिमहिंगोलीचंद्रपूर
-विधानसभा मतदारसंघआर्णीयवतमाळदिग्रसपुसदवणीउमरखेडराळेगांव
-खासदारभावना पुंडलिकराव गवळी • हेमंत पाटील • सुरेश धानोरकर
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान९११.४ मिलीमीटर (३५.८८ इंच)
संकेतस्थळ


हा लेख यवतमाळ जिल्ह्याविषयी आहे. यवतमाळ शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

इतिहास

भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.यवतमाळ चे जुने नाव येवत/येवतीचा माळ असे होते

सीमा

जिल्ह्याच्या

हवामान व भौगोलिक विशेषता

या जिल्ह्यात वर्धापैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९६५ मि.मी आहे. जिल्ह्याचा सुमारे २१ % भाग (२८५० किमी) हा वनक्षेत्रात मोडतो.

लोकसंख्याशास्त्र आणि लोकजीवन

जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३,५८४ किमी आहे जे महाराष्ट्राच्या ४.४ % इतके आहे, तर लोकसंख्या २७,७५,४५७ (सन २०११) आहे. जिल्ह्यात अनेक जातीचे, तसेच आंध, गोंड, परधान, टोकरे कोळी आणि कोलाम आणि काही प्रमुख आदिवासी जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी हिंदी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषा बोलल्या जातात.

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्षलोक.±%
इ.स. १९०१5,77,101
इ.स. १९११7,24,410अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","
इ.स. १९२१7,48,959अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","
इ.स. १९३१8,57,288अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","
इ.स. १९४१8,87,738अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","
इ.स. १९५१9,31,982अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","
इ.स. १९६१10,98,470अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","
इ.स. १९७१14,23,677अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","
इ.स. १९८१17,37,423अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","
इ.स. १९९१20,77,144अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","
इ.स. २००१24,58,271अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","
इ.स. २०११27,72,348अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","
source:[२]

जिल्ह्यातील धरणे

यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा नदी वरील बेंबळा धरण, अरुणावती नदी वरील अरुणावती धरणपूस नदी वरील पूस धरण ही मोठी व प्रमुख धरणे आहेत. यापैकी बेंबळा धरण ईसापूर धरण पैनगंगा नदी (पुसद) हे यांपैकी सर्वात मोठे आहे

मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरण हे प्रसिद्ध आहे,सायखेडा धरण,यवतमाळ येथील, बोरगाव धरण, निळोणा धरण हे निसर्ग मय वातावरण आहे व तेथे पर्यटक म्हणून भेट पण देत असतात

जिल्ह्यातील व्यवसाय

जिल्ह्यात हातविणकाम(हॅंडलूम), विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग व तेल उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची पिके- कापूस, ज्वारी, भुईमूग, तूर-डाळ ही आहेत. जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो. जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तेथून लाकूड, बांबू, तेंदू, आपटा, हिरडामोह या उपयोगी वस्तू मिळतात. यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हानेर ही महत्त्वाची व्यापार-केंद्रे आहेत. चांदले शिलाई मशीन हे उमरखेड तालुक्यातील शिलाई मशीनचे अधिकृत व्यापार केंद्रे आहेत

पर्यटन

टीप्पेश्वर अभयारण्य सुन्ना तालुका केलापुर, जिल्हा यवतमाळ, 445302 राज्य महाराष्ट्र देश भारत वन्यप्राणी - वाघ, मोर, अस्वल, रोही, इत्यादी.या अभ्यारण्या मध्ये टीपाई माता मंदिर आहे. याच्या आजूबाजूला बाहत्तर, बोथ, भाड उमरी, कल्लेश्वर, जाम, हे गावे आहेत.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

आर्णी येथील बाबा कंबल्पोष जत्रा(सर्व धर्मियांचे श्रद्धा स्थान मानले जाते),घंटीबाबा जत्रा (दिग्रस), रंगनाथ स्वामी जत्रा (वणी) वणी तालुक्यातील शिरपूर या गावात प्राचीन शिव मंदिर व गोंडराजा यांची राजधानी असलेलं प्राचीन किल्ला आहे व महाशिवरात्री ला शिरपूर गावात शिव मंदिर असल्यामुळे भव्य अशी यात्रा भरते, वणी तालुक्यातील वरझडी हे गाव आहे त्याला लागून जंगले आहे व त्या जंगले मध्ये माँ जगदंबा माते चे प्राचीन मंदिर आहे निसर्गमय वातावरणात हे मंदिर आहे इतर जत्रेची ठिकाणे- कळंब, घाटंजी जवळच्या अंजी येथील नृसिंह मंदिर, वणी, तपोणा, पुसद, महागाव, कळंब येथील चिंतामणी मंदिर, रंगनाथ स्वामींचे मंदिर(वणी) इत्यादी पर्यटनस्थळे येथे आहेत आणि पांढरकवडा येेथिल जगदंबा देवी संंस्थान केलापूर ही आहेेेत,भवानी टेकडी-दिग्रस,वाघाडी नदीवरील-निळोना,चापडोह,पिंगळाई देवी नाथशक्तीपिठ करळगाव घाट [यवतमाळ] उमरखेड तालुक्यातील अबोना तलावदारव्हा तालुक्यातील देऊळगाव वळसा या गावी 190 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या वाघामाय देवी व महालक्ष्मी देवी चे भव्य मंदिर आहे व जंगले व वने लागून हे गाव आहे गावापासून 2 किमी अंतरावर जंगल मध्ये मूळ देवस्थान आहे. आसेगाव देवी ता.बाभुळगाव येथील जगदंबा माता मंदिर हे अतिशय प्राचीन असून ई.स.1670 पासूनचे हे प्राचीन मंदिर आहे. येथे नवरात्र व चैत्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

जिल्ह्यातील तालुके

जल संधारण

या जिल्ह्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर सर्वात मोठे धरण आहे. वनराई बंधारे या योजनेखाली २००५ ते २००८ या चार वर्षांत तब्बल २८,५५३ बंधारे बांधण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात २००४ साली दुष्काळ होता. सुमारे सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी वाया गेली होती. नद्या, नाले, विहिरी, विंधनविहिरी कोरड्या झाल्या होत्या. जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी १.९९ मीटरने खाली गेली. ९५ टक्के गावांमध्ये डिसेंबर अखेर पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली.

गावभेटी तसेच, ग्रामस्थ-अधिकारी यांच्या चर्चेतून एक वास्तव समोर आले. ते म्हणजे जलसंधारणातील लोकसहभागाचा अभाव. त्याचबरोबर नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून राहण्याची मानसिकता. २००५ मध्ये सुदैवाने चांगला पाऊस झाला. या अनुकूल परिस्थितीत जलसंधारण, त्याला लोकसहभागाची जोड, श्रमदान यासाठी विशेष उपक्रम घेणे आवश्यक होते. त्यासाठी सहजसोपे व विनाखर्ची वनराई बंधारे निर्मितीचे माध्यम निवडले गेले. विविध विकासात्मक कामांसाठी बांधकामातील पोती आणि विक्रेता संघ-कंत्राटदार संघटना यांनी दिलेली सिमेंटची रिकामी पोती त्यासाठी वापरण्यात आली.

२००५ सालापासून पर्यावरण विषय शालेय अभ्यासक्रमात आला. त्यामुळे उपक्रमाच्या पहिल्या वर्षी ‘एक शाळा-एक वनराई बंधारा’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील १८५९ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी तब्बल २०४७ वनराई बंधारे बांधले. याची दखल घेऊन ‘युनिसेफ’ने हा वृत्तान्त आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला. त्यानंतरही विद्यार्थ्यांचा सहभाग कायम होता. सलग चार वर्षांत विद्यार्थ्यांनी एकूण ८,३३७ बंधारे बांधले. बंधारे बांधताना ते इतरांसाठी उपयुक्त ठरतील, याकडे विशेष लक्ष दिले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी थेट जंगलात जाऊन वन्यजीवांसाठी वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली. तर काही ठिकाणी गावठाण परिसरातील सार्वजनिक विहिरींची पातळी वाढविण्यास साहाय्यक ठरतील, अशा ठिकाणी वनराई बंधारे बांधले गेले.

संदर्भ

बाह्य दुवे

यवतमाळ एन.आय.सी[Central Provinces District Gazetteers, 1908]