युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया

युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया तथा युपेन हे अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरातील विद्यापीठ आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील हे विद्यापीठ अमेरिकेला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्थापन झालेल्या नऊ विद्यापीठांपैकी एक आहे.

बेंजामिन फ्रॅंकलिन या विद्यापीठाच्या स्थापकांपैकी एक होता. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपैकी दोन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसह १४ राष्ट्रप्रमुख, तीन अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अमेरिकेचे ३३ सेनेटर, १५८ प्रतिनिधी, ४२ गव्हर्नर तसेच २५ अब्जाधीश होते. याशिवाय अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर सही करणाऱ्यांपैकी आठ व्यक्ती युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाचे विद्यार्थी होते.[१][२][३]

संदर्भ आणि नोंदी