रियाध

सौदी अरेबियाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर


रियाध (अरबी: الرياض‎ ; उच्चार : अर्-रियाध; अर्थ : बगीचा) ही सौदी अरेबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. ते रियाध प्रांताच्याही राजधानीचे शहर आहे. अरबी द्वीपकल्पाच्या मध्यभागी एका विस्तीर्ण पठारावर ते वसले असून सुमारे ४८,५४,००० लोकसंख्येचे[१] शहर आहे.[२]

रियाध
لرياض
(अर्-रियाध)
सौदी अरेबिया देशाची राजधानी
रियाध is located in सौदी अरेबिया
रियाध
रियाध
रियाधचे सौदी अरेबियामधील स्थान

गुणक: 24°38′N 46°43′E / 24.633°N 46.717°E / 24.633; 46.717

देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
प्रांत रियाध प्रांत
क्षेत्रफळ १,००० चौ. किमी (३९० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४८,५४,०००
  - घनता ३,०२४ /चौ. किमी (७,८३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ +३ युटीसी
http://www.arriyadh.com/

याला पूर्वी हाइर अल-यमामाह असे नाव होती.[३]

वस्तीविभागणी

रियाधची वस्तीविभागणी
ऐतिहासिक लोकसंख्या
वर्षलोक.±%
इ.स. १९१८१८,०००
इ.स. १९२४३०,०००+६६%
इ.स. १९४४५०,०००+६६%
इ.स. १९५२८०,०००+६०%
इ.स. १९६०१,५०,०००+८७%
इ.स. १९७२५,००,०००+२३३%
इ.स. १९७८७,६०,०००+५२%
इ.स. १९८७१३,८९,०००+८२%
इ.स. १९९२२७,७६,०००+९९%
इ.स. १९९७३१,००,०००+११%
इ.स. २००९४८,७३,७२३+५७%
इ.स. २०१३५८,९९,५२८+२१%
इ.स. २०१६६५,०६,७००+१०%
इ.स. २०१७७६,७६,६५४+१८%
Source: जनगणना

१९३५ साली शहराची लोकसंख्या ४०,००० होती तर १९४९मध्ये ८३,००० होती.[४] १९६० च्या सुमारास १,५०,००० लोकसंख्या असलेल्या शहरात २०२३ च्या सुमारास ७०,००,००० लोक राहत होती. २०१७मध्ये रियाधमधील लोकसंख्येत ६४.१९% व्यक्ती सौदी होत्या तर ३५.८१% लोक परदेशी होत्या. यांतील १३.७% मूळ भारतीय तर १२.४% लोक मूळ पाकिस्तानी होत्या.[५]

वाहतूक

विमानसेवा

किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ रियाध शहर आणि आसपासच्या प्रदेशातील मुख्य विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३५ किमी उत्तरेस असलेल्या या विमानतळावरून दरसाल २ कोटी प्रवासी ये-जा करतात.[६] या मोठ्या विमानतळाचा अजून विकास करण्याचे बेत असून २०३० पर्यंत तेथे सहा समांतर धावपट्ट्या आणि ३ ते ४ प्रवासी टर्मिनल बांधली जातील. त्या वेळी याचे पुनर्नामकरण किंग सलमान आंतरराष्ट्रीय विमानतळ असे केले जाईल. २०३०मध्ये याची क्षमता दरसाल १२ कोटी प्रवासी तर २०५०पर्यंत १५ कोटी प्रवासी वाहण्याची असेल.[७][८]

मेट्रो

रियाध मेट्रोचे बांधकाम २०१० च्या दशकात सुरू झाले व २०२४पर्यंत ही सेवा सुरू होण्याचा अंदाज आहे.[९][१०]

बस

रियाधमधील सार्वजनिक बससेवेचे जाळे ८५ किमी लांबीचे असून त्यात तीन बस रॅपिड ट्रान्झिट सेवा आहेत. हे जाळे मेट्रोशी जोडले जाईल.

रियाधपासून देशातील इतर शहरांना बससेवा उपलब्ध असून हीच कंपनी आखाती सहकार समितीच्या सदस्य देशांपर्यंत बस नेतात. याशिवाय इजिप्तलाही बस सेवा उपलब्ध आहे.[११]

रेल्वे

सौदी रेल्वे संघटना रियाधपासून दम्मामला दोन मार्गांनी रेल्वे सेवा पुरवते. होफुफ आणि हराध मार्गे जाणाऱ्या गाड्या प्रवासी आणि मालवाहतूक करतात.

भविष्यात रियाधपासून मक्का आणि जेद्दा तसेच हाइल प्रांतातील बुरैदा शहरांना जोडणारे रेल्वेमार्ग बांधले जातील.[१२]

रस्ते

रियाध शहराला महामार्गांचे जाळे आहे. शहराला पूर्व रिंग रोड आणि उत्तर रिंग रोड ही दोन बाह्यवळणे आहेत. किंग फह्द रोड शहरातून उत्तर-दक्षिण धावतो तर मक्का रोड शहराच्या पूर्व भागाला आणि डिप्लोमॅटिक क्वार्टरला मध्यवर्ती भागाशी जोडतो.[१३]

संदर्भ

बाह्य दुवे