रेडिंग (बर्कशायर)

रेडिंग ( /ˈrɛdɪŋ/) [२] हे इंग्लंडच्या बर्कशायर काउंटीमधील एक शहर आहे.थेम्स आणि केनेट नद्यांच्या संगमावर थेम्सच्या खोऱ्यात वसलेले हे शहर लंडनपासून ६४ किमी पश्चिमेस, स्विंडनपासून ६४ किमी पूर्वेस आणि ऑक्सफर्डपासून ४० किमी दक्षिणेस आहे.

रेडिंग
बोरो ऑफ रेडिंग
वरुन डावीकडे: रेडिंगचा जुना बाजार आणि रेडिंग नगरगृह, मैवाल्ड सिंह, शहराचा देखावा, रेडिंग अॅबीचे भग्नावशेष द ऑरेकल (बाजार)
वरुन डावीकडे: रेडिंगचा जुना बाजार आणि रेडिंग नगरगृह, मैवाल्ड सिंह, शहराचा देखावा, रेडिंग अॅबीचे भग्नावशेष द ऑरेकल (बाजार)
Official logo of रेडिंग
Motto(s): 
अ डेओ एट रेजिना
देव आणि राणीच्या सह
बर्कशायरमधील रेडिंगचे स्थान
बर्कशायरमधील रेडिंगचे स्थान
रेडिंग is located in इंग्लंड
रेडिंग
रेडिंग
बर्कशायरमधील रेडिंगचे स्थान
गुणक: 51°27′15″N 0°58′23″W / 51.45417°N 0.97306°W / 51.45417; -0.97306 0°58′23″W / 51.45417°N 0.97306°W / 51.45417; -0.97306
देशFlag of the United Kingdom United Kingdom
युनायटेड किंग्डममधील देशइंग्लंड ध्वज England
इंग्लंडचे प्रांतआग्नेय इंग्लंड
इंग्लंडच्या काउंट्याबर्कशायर
Admin HQरेडिंग
वस्तीइ.स. ८७१ किंवा त्यापूर्वी
नगरस्थापनाइ.स. १०८६ किंवा त्यापूर्वी
सरकार
 • प्रकारइंग्लंडमधील युनिटरी ऑथोरिटी
 • Bodyरेडिंग बोरो काउन्सिल
Elevation
६१ m (२०० ft)
लोकसंख्या
 • Urban
३,३७,१०८
 • Urban densityएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
 • Ethnicity (Borough)[१]
  • ६७.२% White
    • (५३.५% White British)
  • १७.७% British Asian
  • ७.२ % Black
  • ५.१% Mixed
  • २.८% Other
 • Ethnicity (Borough)[१] densityएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Demonym(s)Redingensian, Readingite[ संदर्भ हवा ]
टपाल क्र
आरजी
Area code(s)०११८
संकेतस्थळreading.gov.uk

रेडिंग हे थेम्स खोऱ्यातील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. येथे विशेषत: माहिती तंत्रज्ञान आणि विमाकंपन्याची आवारे आहेत. [३] हे एक प्रादेशिक विक्री केंद्र देखील आहे. रेडिंग विद्यापीठाचे मुख्य आवार येथे आहे. रेडिंग एफ.सी. येथील असोसिएशन फुटबॉल संघ आहे.

रेडिंग नगरगृह
ब्रॉड स्ट्रीट
धर्म2001 [४]2011 [५]२०२१ [६]
क्रमांक%क्रमांक%क्रमांक%
ख्रिश्चन८९,६१८६२.६७७,८४८५०.०६८,९८७३९.६
बौद्ध६८८०.५१,८७६१.२2,887१.७
हिंदू१,४१७१.०५,६६१३.६८,७५७५.०
ज्यू४१५०.३3550.2३२९0.2
मुसलमान५,७३०४.०11,007७.११५,४८१८.९
शीख७८१०.५९४७०.६१,१९४०.७
इतर धर्म५१८०.४701०.५१,२४१०.७
धर्म नाही३१,४८६22.0४५,९३१29.5६३,२८७३६.३
धर्म सांगितलेला नाही१२,४४३८.७11,372७.३१२,०६२६.९
एकूण लोकसंख्या१४३,०९६१००.०१५५,६९८१००.०१७४,२२६१००.००

जागतिक ऑषध कंपनी बायर लाइफ सायन्सेसने २०१६मध्ये आपले मुख्यालय रेडिंगच्या ग्रीन पार्क बिझनेस पार्कमध्ये हलवले [७] इंटरनॅशनल कॉम्प्युटर्स लिमिटेड [८] आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनच्याया माहिती तंत्रज्ञान कंपन्या रेडिंगमध्ये अनेक दशके आहेत. [९] यांशिवाय हुआवेई टेक्नोलॉजीझ, पेगासिस्टम्स, सीजीआय इंक, अॅजिलंट टेक्नोलॉजीझ, सिस्को, एरिक्सन, सिमँटेक, वेरायझन बिझनेस व इतर अनेक कंपन्यांची आवारे येथे आहेत.[१०] [११] [१२] [११] [१३]

जेन ऑस्टेन यांची अॅबी गेटवे ही शाळआ

इंग्लिश लेखिका जेन ऑस्टेनने १७८४-८६ दरम्यान येथील अॅबे गेटवे या शाळेच्या रीडिंग लेडीज बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. [१४] थॉमस हार्डीने रेडिंगचे वर्णन आपल्या लेखनात 'अल्डब्रिकहॅम' नावाने केले आहे. [१५]

ऑस्कर वाइल्ड १८९५ ते १८९७ दरम्यान रेडिंग तुरुंगात कैद होते. तेथे असताना त्यांनी डी प्रोफंडिस हे पत्र लिहिले. सुटकेनंतर फ्रांसमध्ये राहून त्यांनी रेडिंग तुरुंगात पाहिलेल्या चार्ल्स वूल्ड्रिजच्या फाशी वर आधारित द बॅलड ऑफ रीडिंग गॅओल हे पुस्तक लिहिले.[१६] [१७] रेडिंगच्या रहिवासी रिकी जर्व्हेसने आपला सिमेटरी जंक्शन हा १९७०चे रेडिंग ही पार्श्वभूमी असलेला आणि ईस्ट रेडिंगमधील एका व्यस्त भागाचे चित्रण असलेला चित्रपट बनवला. [१८] [१९] [२०]

युनिव्हर्सिटी ऑफ रेडिंगचे आवार

रेल्वे

ऑक्टोबर २०२३मध्ये रेडिंग रेल्वे स्थानकाचे विहंगम दृश्य

रेडिंग हा नॅशनल रेल प्रणालीचा एक प्रमुख चौफुला आहे. रेडिंग रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे जंक्शन आहे.[२१] [२२] येथून लंडनमधील पॅडिंग्टन आणि वॉटरलू या दोन्ही स्थानकांना रेल्वेसेवा उपलब्ध आहे. मुख्य रेडिंग स्थानकाशिवाय रेडिंग वेस्ट, रीडिंग ग्रीन पार्क, टाइलहर्स्ट आणि अर्ली ही इतर स्थानके रेडिंग शहराला रेल्वेसेवा पुरवतात..

रेडिंग हे एलिझाबेथ लाइनचे पश्चिमेकडील शेवटचे स्थानक आहे. या मार्गावरुन जे लंडन पॅडिंग्टन पर्यंत थांबत जाणारी रेल्वेसेवा आहे. रेडिंगपासून पूर्वेकडील अॅबी वूड आणि शेनफील्डपर्यंत जाता येते.[२३]

सिलेक्ट कार लीझींग स्टेडियम, रीडिंग एफ.सी.चे घरचे मैदान

रेडिंगची जुळी शहरे: [२४]

संदर्भ