लांडगा

लांडगा हा श्वान (Canidae) कुळातील एक मांसाहारी प्राणी आहे. यातील ४० उपप्रजाती असलेली करडा लांडगा(Canis lupus) ही सर्वात मोठी प्रजाती आहे(कुत्रा व डिंगो वगळून). भारतीय लांडगा देखील याच प्रजातीत येतो.

लांडगा
इथियोपियाई लांडगा
इथियोपियाई लांडगा
प्रजातींची उपलब्धता
Near Threatened
शास्त्रीय वर्गीकरण
वंश:कणाधारी
जात:सस्तन
वर्ग:मांसभक्षक
कुळ:कॅनिडे
जातकुळी:कॅनिस

प्रजाती

कॅनिस जातकुळीमधील जॅकल, कायोटी, कुत्रा व डिंगो हे प्राणी वगळून सर्वाना लांडगा म्हटले जाते.

  • कॅनिस जातकुळी
    • करडा लांडगा (Canis lupus) कुत्रा व डिंगो या उपप्रजाती वगळून
    • लाल लांडगा (Canis rufus)
    • इथियोपियाई लांडगा (Canis simensis)
    • पौर्वात्य लांडगा (Canis lycaon)
    • (Canis dirus) नामशेष
    • (Canis armbrusteri) नामशेष
    • (Canis edwardii) नामशेष
    • (Canis lepophagus) नामशेष
  • Chrysocyon जातकुळी
    • आयाळवाला लांडगा (Chrysocyon brachyurus) थोडासा लाल कोल्ह्यासारखा दिसत असला तरी हा कोल्हाही नाही व लांडगाही.