शोधयंत्र

इंटरनेटावर/महाजालात माहितीचा शोध घेण्यास मदत करणाऱ्या संकेतस्थळांना 'शोध यंत्र' (इंग्लिश:Search Engine) असे म्हणतात. एखादा कोणताही विशिष्ट शब्द किंवा शब्दसमूह ज्या-ज्या वेबपानांवरील मजकुरात असेल, अशी सर्व वेबपाने दाखवण्याचे काम शोधयंत्र करते. बहुतांश आधुनिक लोकप्रिय शोधयंत्रे ही केवळ मजकूरच नव्हे तर, एखाद्या शब्दासंबंधित चित्रे, चलचित्रे व इतर माहिती शोधण्यास मदत करतात. सर्वसाधारणपणे 'शोधयंत्र' ही संज्ञा फक्त इंटरनेटावरील माहिती शोधण्यासंदर्भात वापरली जाते; संगणकावर साठवलेल्या माहितीमध्ये शोध घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरांना 'शोधयंत्र' म्हटले जात नाही.

महाजालात विविध प्रकारांची शोधयंत्रे वापरली जातात. अधिकाधिक लोक आपल्या वेबपानावर येणे हे शोधयंत्राने दिलेल्या स्थानांकनावर अवलंबून आहे; तसेच ते वेबपानाच्या शोधयंत्र मैत्रीपूर्णतेवरही अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे.

गूगल

गूगल शोधयंत्राचे महत्त्व आणि वापर २००१ सालापासून वाढला. गूगल शोधयंत्राचे यश दुव्याच्या उपयोगाचे प्रमाण व त्या-त्या वेबपानाच्या स्थानांकनाच्या संकल्पनेत आहे. एखाद्या वेबपानाचा दुवा इतर किती आणि किती महत्त्वाच्या वेबपानांनी दिला आहे यावर त्या वेबपानाचे स्थानांकन निश्चित होते. याकरिता संबंधित वेबपानावर योग्य आणि जास्तीत जास्त लोकांकडून शोधले जाणारे संदर्भशब्द असणे खूप उपयुक्त ठरते.

मराठी विकिपीडियाचे शोधयंत्रांतील स्थान

मराठी विकिपीडियाचे संदर्भ गूगल शोधयंत्राच्या मराठी आवृत्तीत सहज मिळतात; पण मराठी विकिपीडियाचे संदर्भ गूगल शोधयंत्राच्या इंग्रजी आवृत्तीत उशिरा मिळतात. मराठी विकिपीडियातील सुयोग्य शब्दांचे मराठीबरोबरच रोमन लिपीतील पर्यायही उपलब्ध झाल्यास मराठी विकिपीडिया शोध यंत्र मैत्रीपूर्ण होण्यास मदत होईल.

याहू बझ इंडेक्स

याहू इंडिया 'याहू बझ इंडेक्स'चा वापर करून सर्वांत जास्त शोधल्या जाणाऱ्या शब्दांची माहिती देते. अशा शब्दांचा योग्य वापर वेबपानाची शोधयंत्र मैत्रीपूर्णता वाढवण्यास मदत करतो.

मर्यादा

शोधयंत्र डायनॅमिक फाँट वापरणाऱ्या वेबपानांचे स्थानांकन करू शकत नाही. फक्त युनिकोड चालते. उदाहरणार्थ महाराष्ट्र टाइम्स शोधयंत्रांमार्फत शोधता येतो; पण ई-सकाळ शोधता येत नाही.

शोधयंत्रांमध्ये वेबपानाची नोंदणी

.

कालरेषा

कालरेषा
note: "सुरुवात" refers only to web
availability of original crawl-based
web search engine results.
वर्ष (इ.स.)इंजिनघटना
१९९३Aliwebसुरुवात
१९९४WebCrawlerसुरुवात
१९९४Infoseekसुरुवात
१९९४Lycosसुरुवात
१९९५AltaVistaसुरुवात (part of DEC)
१९९५Exciteसुरुवात
१९९६Dogpileसुरुवात
१९९६Inktomiस्थापना
१९९६Ask Jeevesस्थापना
१९९७Northern Lightसुरुवात
१९९८Googleसुरुवात
१९९९AlltheWebसुरुवात
२०००Teomaस्थापना
२००३Objects Searchसुरुवात
२००४Yahoo! Searchसुरुवात


(first original results)

२००४MSN SearchBeta सुरुवात
२००५MSN SearchFinal सुरुवात
२००६Quaeroस्थापना
२००६Blorbyसुरुवात