साँगक्रन

पारंपारिक थाई नवीन वर्षाची सुट्टी

साँगक्रन (थाई: เทศกาล สงกรานต์; इंग्रजी: Songkran) हा थाई नववर्ष महोत्सव आहे. थाई नववर्षाचा दिवस दरवर्षी १३ एप्रिलला असतो, परंतु सुट्टीचा काळ १४-१५ एप्रिल मध्येही असतो. "साँगक्रन" हा शब्द ‘संक्रांत’ या संस्कृत शब्दापासून आलेला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ "ज्योतिषीय मार्ग", म्हणजे परिवर्तन किंवा बदल हा शब्द मकर संक्रांत पासून उधार घेतला आहे, जानेवारीमध्ये भारतात वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा केला जाणाऱ्या हिंदू कापणीचे नाव आहे. ह्या ज्योतिषीय तक्त्यावर मेषच्या उदयासोबत आणि बौद्ध / हिंदू सौर कालगणनेसोबत दक्षिण आणि आग्नेय आशियााच्या अनेक कॅलेंडरच्या नव्या वर्षासोबत मेळ खातो. हा बौद्ध सण थायलंड, म्यानमार, लाओस व इतर बौद्ध राष्ट्रांत साजरा केला जातो.

साँगक्रन
नववर्षाच्या उत्सवाचे राजरीकरण, रोट नाम दाम हुआ, हा पारंपारिक मार्ग आहे जो वृद्धजनांसह साजरा करतात. बहुतेक थाई लोक त्यांच्या वडिलधाऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात.
अधिकृत नावसाँगक्रन सण
इतर नावेथाई नववर्ष
साजरा करणारेथाई आणि मलेशियातील सिअमेसे[१]
महत्त्वथायलंडच्या नवीन वर्षाची सुरुवात
सुरुवात१३ एप्रिल
समाप्त१५ एप्रिल
दिनांक१३ एप्रिल
वारंवारतावार्षिक
साँगक्रनमधील जलयुद्ध

थायलंडमध्ये साँगक्रन सणाच्या अगोदरच्या दिवशी थाई लोक त्यांची घरे, कपडे व गावातील रस्ते स्वच्छ करतात व अन्न तयार करून नंतर त्याचे भिक्खूंना दान करतात.

नववर्ष परंपरा

साँगक्रन उत्सव प्रतीकात्मक परंपरांसोबत समृद्ध आहे. सकाळपासून हा उत्सव सुरू होतो. साँगक्रनला बौद्ध उपासक आणि उपासिका सकाळीच उठून नजिकच्या विहारात (बौद्ध मंदिरात) जातात. तेथे विहाराबाहेर हातात भिक्षापात्र घेऊन पुष्कळ भिक्खू-भिक्खुणी एका ओळीत उभ्या राहून चालत असतात. बौद्ध उपासक-उपासिका त्यांच्या समोर उभ्या राहून त्यांच्या या भिक्षापात्रात अन्न वाढतात. त्यानंतर मोठ्या शहरातील व वटधम्मराम विहारातील लोक पंचशील ग्रहण करतात, धम्म जाणतात व विहारास पैसे अर्पण करतात. लोकांना धम्मविषयी चर्चा व शिकवण ही भिक्खूंकडून दिली जाते. ती धम्मशिकवण दैनंदिन जीवनाशी निगडीत असते.

दुपारनंतर बुद्धमूर्ती व भिक्खू यांच्यावर उपासक गुलाब पाण्याचा वर्षाव करतात. आदर व्यक्त करण्याचा हा एक संकेत होय. ह्या बदल्यात भिक्खू त्यांना आशीर्वाद देतात. या दिवशी मुलेही पालकांप्रती आदर व्यक्त करतांना त्यांना छोटी भेट वस्तू देतात आणि प्रेम व आदरप दाखवण्यासाठी त्यांच्या अंगावर गुलाब पाणी शिंपडतात. पालक मुलांना आशीर्वाद देतात.

हा सुट्टीचा दिवस जल उत्सवासाठी प्रसिद्ध आहे जो मुख्यतः तरुण लोकांद्वारे साजरा केला जातो. मुख्य रस्त्यांची वाहतूक बंद करून ते पाणी मारामारीसाठी ऍरेना (arenas)[मराठी शब्द सुचवा] म्हणून वापरले जातात. तरुण आणि वृद्ध एकमेकांवर पाणी शिंपडून या परंपरेत भाग घेतात. पारंपारिक परेड[मराठी शब्द सुचवा] आयोजित केली जाते आणि काही ठिकाणी "मिस साँगक्रन" ताज प्राप्त केला जातो. यावेळी स्पर्धकांनी पारंपारिक थाई पोशाख परिधान केलेले असतात.

Songkran at Wat Thai, Los Angeles
Water fights along the west moat, Chiang Mai
People in a tuk-tuk getting soaked during Songkran, Chiang Mai
The use of chalk (लुआ(Lua) त्रुटी विभाग:Unicode_data मध्ये 465 ओळीत: attempt to index field 'scripts' (a boolean value).) is also very common having originated in the chalk used by monks to mark blessings.

थायलंडमधील साँगक्रन

इतरत्र साँगक्रन

अमेरिकेतल्या शिकागोत असलेले थाई उपासक थाई पद्धतीप्रमाणे हा नववर्षाचा उत्सव साजरा करतात.

इतर कॅलेंडरमध्ये

विवाद

थाई चांद्र कॅलेंडरमधील तारखा

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

E-books