इराण–इराक युद्ध

इराण–इराक युद्ध
विषारी वायू संरक्षक मुखवटा लावलेले इराणी सैनिक
विषारी वायू संरक्षक मुखवटा लावलेले इराणी सैनिक
दिनांक२२ सप्टेंबर, १९८०२० ऑगस्ट, १९८८
स्थानइराण-इराक सीमा
परिणतीयुद्ध बरोबरी
युद्धमान पक्ष
इराण ध्वज इराण
पाठिंबा:
सीरिया ध्वज सीरिया[१]
इराक ध्वज इराक
पाठिंबा:
फ्रान्स ध्वज फ्रान्स
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ[२][३]
Flag of the United States अमेरिका
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
कुवेत ध्वज कुवेत[४]
सेनापती
रुहोल्ला खोमेनीसद्दाम हुसेन
सैन्यबळ
१.५ लाख३.५ लाख
इराण–इराक युद्ध - September 22, 1980 तेहरान

इराण–इराक युद्ध इ.स. १९८० ते १९८८ दरम्यान पश्चिम आशियातील इराणइराक देशांदरम्यान लढले गेले. आठ वर्षे चाललेले हे युद्ध २०व्या शतकामधील दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात रक्तरंजित युद्ध मानले जाते.

ह्या युद्धापूर्वी अनेक वर्षे इराण व इराकदरम्यान सीमातंटा सुरू होता. १९७९ सालच्या इराणी क्रांतीनंतर इराकचा राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन ह्याला इराकमधील बहुसंख्य शिया जनता बंडखोरी करेल ही धास्ती वाटू लागली. २२ सप्टेंबर १९८० रोजी कोणत्याही पूर्वसूचनेविना इराकने इराणवर हवाई हल्ला केला. सुरुवातीस पीछेहाट झाल्यानंतर इराणने नेटाने लढा दिला व जून १९८२ मध्ये इराणने गमावलेला सर्व भूभाग परत मिळवला. त्यानंतरची ६ वर्षे युद्धात इराणचा वरचष्मा होता. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने वारंवार युद्धबंदीचे आवाहन केल्यानंतर अखेरीस २० ऑगस्ट १९८८ रोजी लढाई थांबली.

ह्या युद्धामध्ये दोन्ही देशांचे अतोनात नुकसान व जिवितहानी झाली परंतु सीमास्थिती बदलली नाही.

बाह्य दुवे

संदर्भ