एफ.सी. बार्सेलोना

फुटबॉल क्लब
(एफसी बार्सेलोना ब या पानावरून पुनर्निर्देशित)

एफ.सी. बार्सिलोना (कातालानस्पॅनिश: Futbol Club Barcelona) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९९ साली स्थापन झालेला बार्सिलोना जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक मानला जातो. स्पेनच्या ला लीगा ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या लीगमध्ये खेळणाऱ्या बार्सिलोनाने आजवर देशामधील व युरोपातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत.

एफ.सी. बार्सिलोना
पूर्ण नावफुटबॉल क्लब बार्सिलोना
(Futbol Club Barcelona)
टोपणनावबार्सा (Barça)
कुलेस (Culés)
ब्लाउग्रानेस (Blaugranes, निळे-मरून)
स्थापनानोव्हेंबर २९, १८९९
(as Foot-Ball Club Barcelona)
मैदानकॅंप नोउ,
बार्सिलोना, कातालोनिया (स्पेन)
(आसनक्षमता: ९९,३५४)
मुख्य प्रशिक्षकस्पेन लुइस एनरीके
लीगला लीगा
२०१४-१५ला लीगा, विजेता
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

जगात सर्वाधिक चाहते असलेल्या संघांपैकी एक असलेल्या बर्सिलोनाची रेआल माद्रिद ह्या स्पेनमधील दुसऱ्या बलाढ्य संघासोबत अनेक दशकांची तीव्र प्रतिस्पर्धा आहे व सध्या रेआल माद्रिद खालोखाल बार्सिलोना युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम क्लब आहे. ३२० कोटी अमेरिकन डॉलर इतके मूल्य असलेला बार्सिलोना जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत फुटबॉल क्लब आहे.

विजेतेपदे

देशांतर्गत

  • ला लीगा: २३ वेळा
  • कोपा देल रे: २७ वेळा (विक्रमी)
  • सुपरकोपा दे एस्पान्या: ११ वेळा (विक्रमी)

युरोपीय

आंतरराष्ट्रीय

  • फिफा क्लब विश्वचषक: २ वेळा (विक्रम ब्राझीलच्या कोरिंथियान्ससोबत विभागून)

सद्य संघ

३० जानेवारी २०१५ रोजी[१]
क्र.जागानाव
1 गो.र.मार्क-आंद्रे टेर श्टेगन
2 डिफेंमार्तिन मोन्तोया
3 डिफेंगेरार्ड पिके
4 मि.फी.इवान राकिटीच
5 मि.फी.सेर्जियो बुस्केत्स (चौथा कर्णधार)
6 मि.फी.झावी (कर्णधार)
7 फॉर.पेद्रो
8 मि.फी.आंद्रेस इनिएस्ता (उप-कर्णधार)
9 फॉर.लुइस सुआरेझ
10 फॉर.लायोनेल मेस्सी (तिसरा कर्णधार)
11 फॉर.नेयमार
12 मि.फी.राफिन्हा
क्र.जागानाव
13 गो.र.क्लॉदियो ब्राव्हो
14 मि.फी.हावियेर मास्केरानो
15 डिफेंमार्क बार्त्रा
16 डिफेंडग्लस
18 डिफेंहोर्दी अल्बा
20 मि.फी.सेर्जी रोबेर्तो
21 डिफेंआद्रियानो
22 डिफेंडॅनियल अल्वेस
23 डिफेंटोमास फेर्मालेन
24 डिफेंजेरेमी मॅथ्यू
25 गो.र.होर्दी मासिप

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन