ओहायो नदी

ओहायो नदी (इंग्लिश: Ohio River) ही मिसिसिपी नदीची सर्वात मोठी उपनदी व अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या पूर्व भागामधील एक प्रमुख नदी आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहरात अलेघेनी व मनोंगहेला ह्या नद्यांच्या संगमातून ओहायो नदीची सुरुवात होते. तेथून नैऋत्य दिशेला १,५७९ किमी लांब वाहत जाउन ओहायो नदी इलिनॉयमिसूरी राज्यांच्या सीमेवरील कैरो ह्या शहराजवळ मिसिसिपी नदीला मिळते.

अमेरिकेच्या नकाशावर ओहायो नदीचा मार्ग
पिट्सबर्ग ह्या शहरामध्ये अलेघेनी व मनोंगहेला ह्या नद्यांच्या संगमातून ओहायो नदीची सुरुवात होते.
लुईव्हिल ह्या केंटकीमधील शहराजवळ ओहायो नदीचे पात्र १ मैल रुंद आहे.

ओहायो नदीचे पाणलोट क्षेत्र ४,९०,६०० चौरस किमी पसरले असून ह्या क्षेत्रामध्ये १४ राज्यांचा समावेश होतो. ओहायो, इंडियानाइलिनॉय ह्या राज्यांच्या दक्षिण सीमा तसेच वेस्ट व्हर्जिनियाकेंटकी राज्यांच्या उत्तर सीमा ओहायो नदीने आखल्या आहेत.

प्रमुख शहरे

खालील प्रमुख शहरे व महानगरे ओहायो नदीच्या काठावर वसलेली अहेत.

महानगरलोकसंख्या
पिट्सबर्ग२४ लाख
सिनसिनाटी२२ लाख
लुईव्हिल१४ लाख
एव्हान्सव्हिल३.५ लाख
लुईव्हिल शहराजवळील ओहायो नदीचे विस्तृत चित्र