जस्टिन हेनिन

जस्टिन हेनिन (फ्रेंच: Justine Henin; २००१-२००५ दरम्यानचे नावः जस्टिन हेनिन-हार्देन) ही बेल्जियम देशाची एक माजी टेनिसपटू आहे. हेनिनने आपल्या कारकिर्दीत सात ग्रॅंडस्लॅम व एकूण ४३ महिला एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या. तसेच तिने २००४ अथेन्स ऑलिंपिकमध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक मिळवले. हेनिन डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये एकूण ११७ आठवडे अव्वल क्रमांकावर होती.

जस्टिन हेनिन
देशबेल्जियम ध्वज बेल्जियम
वास्तव्यब्रसेल्स
जन्म१ जून, १९८२ (1982-06-01) (वय: ४१)
लीज
उंची१.६७ मी (५ फु + इं)
सुरुवात१ जानेवारी १९९९
निवृत्ती२६ जानेवारी २०११
शैलीउजवी
बक्षिस मिळकत$ २,०८,६३,३३५
एकेरी
प्रदर्शन५२५ - ११५
अजिंक्यपदे४३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (२० ऑक्टोबर २००३)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२००४)
फ्रेंच ओपनविजयी (२००३, २००५, २००६, २००७)
विंबल्डनअंतिम फेरी (२००१, २००७)
यू.एस. ओपनविजयी (२००३, २००७)
इतर स्पर्धा
दुहेरी
प्रदर्शन४७ - ३५
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
शेवटचा बदल: सप्टेंबर २६, इ.स. २०११.


पदक माहिती
बेल्जियमबेल्जियम या देशासाठी खेळतांंना
टेनिस
ऑलिंपिक खेळ
सुवर्ण२००४ अथेन्समहिला एकेरी

आपल्या मानसिक व शारिरिक क्षमता, चपळाई व खेळामधील वैविध्यामुळे हेनिन आजवरच्या सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंपैकी एक मानली जाते. तिचा एकहाती बॅकहॅंड महिला व पुरुष टेनिसमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे मत जॉन मॅकएन्रोने व्यक्त केले आहे तर आपल्या पिढीमधील सर्वात प्रतिभाशाली टेनिस खेळाडू ह्या शब्दांत बिली जीन किंग, आंद्रे अगासीमार्टिना नवरातिलोव्हा ह्या माजी टेनिस खेळाडूंनी हेनिनचे कौतुक केले आहे. आपल्या यशासाठी हेनिनचा २००७ साली बेल्जियममधील सर्वोत्कृष्ट खेळाडू तर २००८ साली लॉरियस वार्षिक महिला क्रीडापटू हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या

निकालवर्षस्पर्धाकोर्ट प्रकारप्रतिस्पर्धीस्कोअर
उप-विजेती२००१विंबल्डनगवताळ व्हिनस विल्यम्स6–1, 3–6, 6–0
विजेती२००३फ्रेंच ओपन (1)माती किम क्लाइजस्टर्स6–0, 6–4
विजेती२००३युएस ओपन (1)हार्ड किम क्लाइजस्टर्स7–5, 6–1
विजेती२००४ऑस्ट्रेलियन ओपन (1)हार्ड किम क्लाइजस्टर्स6–3, 4–6, 6–3
विजेती२००५फ्रेंच ओपन (2)माती मेरी पीयर्स6–1, 6–1
उप-विजेती२००६ऑस्ट्रेलियन ओपनहार्ड अमेली मॉरेस्मो6–1, 2–0 निवृत्त
विजेती२००६फ्रेंच ओपन (3)माती स्वेतलाना कुझ्नेत्सोवा6–4, 6–4
उप-विजेती२००६विंबल्डनगवताळ आमेली मॉरेस्मो2–6, 6–3, 6–4
उप-विजेती२००६युएस ओपनहार्ड मारिया शारापोव्हा6–4, 6–4
विजेती२००७फ्रेंच ओपन (4)माती आना इवानोविच6–1, 6–2
विजेती२००७युएस ओपन (2)हार्ड स्वेतलाना कुझ्नेत्सोवा6–1, 6–3
उप-विजेती२०१०ऑस्ट्रेलियन ओपनहार्ड सेरेना विल्यम्स6–4, 3–6, 6–2

बाह्य दुवे

मागील
किम क्लाइजस्टर्स
किम क्लाइजस्टर्स
आमेली मॉरेस्मो
मारिया शारापोव्हा
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
२० ऑक्टोबर २००३ – २६ ऑक्टोबर २००३
१० नोव्हेंबर २००३ – १२ सप्टेंबर २००४
१३ नोव्हेंबर २००६ – २२ जानेवारी २००७
१९ मार्च २००७ – १९ मे २००८
पुढील
किम क्लाइजस्टर्स
अमेली मॉरेस्मो
मारिया शारापोव्हा
मारिया शारापोव्हा