दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ

दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ (रशियन: Московский аэропорт Домоде́дово) (आहसंवि: DMEआप्रविको: UUDD) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक विमानतळ आहे. मॉस्को महानगराला सेवा पुरवणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी दोमोदेदोवो हा सर्वात मोठा विमानतळ आहे. शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व व्नुकोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर दोन विमानतळ देखील मॉस्कोमध्येच आहेत. मॉस्को शहराच्या ४२ किमी आग्नेयेस स्थित असलेला दोमोदेदोवो विमानतळ १९६४ साली बांधला गेला. रशियामधील अनेक लहान विमान कंपन्यांचे हब येथेच आहेत. दोमोदेदोवोमध्ये २ धावपट्ट्या व १ टर्मिनल असून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना येथून थेट विमानसेवा पुरवली जाते.

दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
Московский аэропорт Домоде́дово (रशियन)
आहसंवि: DMEआप्रविको: UUDD
DME is located in रशिया
DME
DME
रशियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
कोण्या शहरास सेवामॉस्को
स्थळदोमोदेदोवो, मॉस्को ओब्लास्त
हबरूसलाइन
एस७ एअरलाइन्स
ट्रान्सएरो एअरलाइन्स
उरल एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची५८८ फू / १७९ मी
गुणक (भौगोलिक)55°24′31″N 37°54′22″E / 55.40861°N 37.90611°E / 55.40861; 37.90611 37°54′22″E / 55.40861°N 37.90611°E / 55.40861; 37.90611
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
14L/32R१२,४६७३,८००डांबरी
14R/32L११,६४७३,५५०डांबरी
सांख्यिकी (२०१३)
प्रवासी३,०७,६०,०००
विमाने२,५३,५००
स्रोत: बातमी[१]
येथे थांबलेले अझरबैजान एरलाइन्सचे बोईंग ७५७ विमान

संदर्भ

बाह्य दुवे