बेलारूस

पूर्व यूरोपामधील एक भूपरिवेष्टित देश


बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

बेलारूस
Рэспубліка Беларусь
बेलारूसचे प्रजासत्ताक
बेलारूसचा ध्वजबेलारूसचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: Дзяржаўны гімн Рэспублікі Беларусь
(आम्ही बेलारूसी)
बेलारूसचे स्थान
बेलारूसचे स्थान
बेलारूसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मिन्‍स्‍क
अधिकृत भाषाबेलारूशियन, रशियन
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखअलेक्झांडर लुकाशेन्को
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस(सोव्हिएत संघापासून)
जुलै २७, १९९० (घोषित)
ऑगस्ट २५, १९९१ (स्थापना) 
क्षेत्रफळ
 - एकूण२,०७,५९५ किमी (८५वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 - २००९९६,४८,५३३[१] (८६वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता४५.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण१३०.७८० अब्ज[२] अमेरिकन डॉलर (६४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१३,८६४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७३२[३] (उच्च) (६१ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलनबेलारूशियन रुबल
आंतरराष्ट्रीय कालविभागपूर्व युरोपीय प्रमाणवेळ (EET) (यूटीसी +२/+३)
आय.एस.ओ. ३१६६-१BY
आंतरजाल प्रत्यय.by
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+३७५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

सोव्हिएत संघाच्या मूळ घटक गणराज्यांपैकी एक असलेल्या बेलारूसची १/३ लोकसंख्या व अर्धी आर्थिक व्यवस्था दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाली होती. २५ ऑगस्ट १९९१ रोजी बेलारूसने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या येथे अध्यक्षीय लोकशाही असून शेती व उत्पादन हे दोन प्रमुख उद्योग आहेत. बेलारूसचा मानवी विकास निर्देशांक स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रथम स्थानावर आहे.