बोईंग ७०७

बोईंग ७०७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान होते.

बोईंग ७०७
प्रकारमध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देशअमेरिका
उत्पादकबोईंग
पहिले उड्डाणडिसेंबर २०, इ.स. १९५७
समावेशऑक्टोबर , १९५८
सद्यस्थितीप्रवासीवाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्तापॅन अमेरिकन एअरलाइन्स
उत्पादन काळ१९५८-१९७९
उत्पादित संख्या१,०१०
प्रति एककी किंमत४३ लाख अमेरिकन डॉलर (१९५५ मधील)
मूळ प्रकारबोईंग ३६७-८०
उपप्रकारसी-१३७ स्ट्रॅटोलायनर
ई-३ सेंट्री
ई-६ मर्क्युरी
ई-८ जॉइंट स्टार्स

चार इंजिने असलेले हे विमान बोईंगने १९५० च्या दशकात विकसीत केले. या विमानाच्या १,०१० प्रतिकृती विकण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या सफल झालेल्या पहिल्या काही जेट विमानांपैकी ७०७ (सेव्हेन ओह सेव्हेन) होते. या विमानाने बोईंगला विमान उत्पादकांत अग्रगण्य स्थान दिले व बोईंगच्या ७x७ प्रकारच्या विमानांची सुरुवात करून दिली.

या विमानाचा छोटा आणि अधिक वेगवान उपप्रकार बोईंग ७२० नावाने विकण्यात आला होता.