मनोविकार


मनाला होणाऱ्या विकारांना मनोविकार असे म्हणतात. मानसिक आजार हे एक प्रकारचे शारीरिक विकार होत. जेव्हा शरीरातील हृदय, किडनी व इतर अवयावान्प्रमानेच मेंदू आजारी पडतो तेव्हा मनोविकार होतात. हे बदल जैवरासायनिक द्रव्यांमध्ये किंवा मेंदूच्या जोडण्यांमध्ये होत असतात. असे बिघाड होण्यामागे अनुवांशिकता, परिसराचा प्रभाव, व्यक्तिमत्त्व, शारीरिक स्थिती अशी अनेक करणे असतात. मनोविकार अनेक प्रकारचे असतात. सहसा फक्त वेडेपणा सदृश आजार म्हणजे मनोविकार असे समजले जाते . पण हा गैरसमज आहे. वेडेपणा हे फक्त अनेक मनोविकारांमधील एका मनोविकाराच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण आहे. नैराश्य, चिंता, मंत्रचळ, एखाद्या गोष्टीची अवास्तव आणि अतोनात भीती, उन्माद, स्मृतिभ्रंश, निद्रानाश, भुकेचे विकार, लैंगिकतेचे विकार, शारीरिक लक्षणांतून जाणवणारे मनोविकार, विविध प्रकारची व्यसने असे अनेक प्रकारचे मानसिक आजार असतात. हे आजार ओळखणारे, अभ्यासणारे, त्यावर उपचार करणारे शास्त्र म्हंजे मनोविकारशास्त्र. वैद्यकशास्त्राच्या मूलभूत अभ्यासानंतर,[MBBS] पदवी मिळाल्यावरच मनोविकार शास्त्राचा अभ्यास करता येतो. अनेक गैरसमज, कलंकभावना [STIGMA] .मेंदूच्या रचनेविषयी आणि कार्याविषयी अजूनही नसलेले स्पष्ट आणि पुरेसे ज्ञान यामुळे मनोविकारग्रस्त रुग्ण आजार लपवू बघतात

🔥 Top keywords: विशेष:अलीकडील बदलशिमला करारविशेष:शोधासिंधु पाणी वाटप करारगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाहॉकीबैलगाडीछत्रपती शिवाजी महाराजसदस्य चर्चा:संतोष गोरेसिंधु नदीभारताचे संविधानमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीनवग्रह स्तोत्रअरविंद घोषकाझीरंगा राष्ट्रीय उद्यानमंगळ ग्रहनांदेड जिल्हामहाराष्ट्रातील मागासवर्गीय जातींची यादीशाहू महाराजविकिपीडिया:धूळपाटी२०१५-१७ आयसीसी विश्व साखळी क्रिकेट स्पर्धासंभाजी महाराजकलमास्तनज्ञानेश्वरमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमहाराष्ट्रसंत तुकारामसिंधू पाणी करारमहात्मा फुलेमराठी भाषापोर्तुगालरोहित शर्माविकिपीडिया:ऑनलाइन ज्ञानकोशातून सामग्री सुधारणा मार्गदर्शकसमर्थ रामदास स्वामीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादी