लुई पाश्चर

लुई पाश्चर (डिसेंबर २७,१८२२-सप्टेंबर २८,१८९५) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो.

इ.स.१८८५ मध्ये प्रयोगशाळेत काम करताना

लुई पाश्चर यांच्या  वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. बॅक्टेरियाचा संसर्ग थांबविण्यासाठी दूध आणि वाइनवर उपचार करण्याच्या तंत्राचा शोध त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनसाठी  लावला आहे. ही प्रक्रिया आता पाश्चरायझेशन या नावाने ओळखली जाते. लुई पाश्चर यांना बॅक्टेरियोलॉजीच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि ते "मायक्रोबायोलॉजीचे जनक" म्हणून प्रसिद्ध आहेत[१].

त्यांनी स्पॉंटॅनियस जनरेशन हा सिद्धांत मोडून काढला. फ्रेंच अकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या संयुक्त विद्यमाने त्याने हे दाखवून दिले की निर्जंतुकीकरण आणि सीलबंद फ्लास्कमध्ये काहीही विकसित झाले नाही; आणि, उलट, निर्जंतुकीकरण परंतु खुल्या फ्लास्कमध्ये सूक्ष्मजीव वाढू शकतात. जरी जंतुसंख्येच्या सिद्धांताचा प्रस्ताव मांडणारा पाश्चर पहिला नव्हता, परंतु त्याच्या प्रयोगांनी त्याची योग्यता दर्शविली आणि बहुतेक युरोपला हे सत्य असल्याचे पटवून दिले[२][३].

बालपण

फ्रान्समध्ये ज्युरा येथील डोल या लहानश्या गावात लुई पाश्चर यांचा जन्म २७ डिसेंबर १८२२ साली झाला. लुई यांच्या वडिलांचे नाव जोसेफ पाश्चर हे होते. लुई आपल्या भावंडांबरोबर अतिशय गरिबीत वाढले. लुई यांचा स्वभाव अतिशय कोमल व संवेदनशील होता. त्यांना निसर्गात रमायला खूप आवडे. लुई यांची रेखाटने अतिशय सुंदर असत. १८२७ पर्यंत लुई यांचे बालपण अर्बोई इथे क्विसान्स या नदीकाठी गेले.

विवाह

पाश्चर ज्या महाविद्यालयात काम करत होते, तेथील लॉरेंन्ट या प्राचार्यांची मुलगी मेरी हिच्याशी पाश्चर यांचा विवाह १८४९ साली झाला.

कार्य

  • लुई पाश्चर यांनी हवेमधील धुळीत सूक्ष्मकण असतात हे स्पष्ट केले.
  • लुई पाश्चर यांनी दूध टिकवण्यासाठी निर्जंतुकीकरण या प्रक्रियेचा शोध लावला. या प्रक्रियेला त्यांच्या नावावरून पाश्चरायझेशन असे म्हणतात.
  • कुत्र्याच्या चावण्याने होणाऱ्या रेबीज या रोगावरची लस शोधण्याचे काम लुई पाश्चर यांनी केले.
  • अनेक महाविद्यालयात लुई पाश्चर यांनी प्राध्यापकाचे काम केले.

मृत्यू

लुई पाश्चर यांचा मृत्यू २८ सप्टेंबर १८९५ साली झाला. त्यावेळी त्यांच्या एका विद्यार्थ्याने डीफ्तेरीया या आजारावर उपचार व प्लेगच्या सूक्ष्मजंतूंचा शोधही लावला.

संदर्भ