अलेक्सी नव्हाल्नी

रशिया मधील राजकारणी, वकील आणि कार्यकर्ते

अलेक्सेइ अनातोलीविच नव्हाल्नी (रशियन: Алексей Анатольевич Навальный, ४ जून१९७६ )हे रशिया मधील एक विरोधी नेते वकील व भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते आहेत. ते राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे समीक्षक आहे.[१]

अलेक्सेइ नव्हाल्नी
Алексей Навальный

भविष्यातील रशिया पक्षाचे अध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१७ नोव्हेंबर २०१३

जन्म४ जून, १९७६
बूत्यीन, (सोव्हियेत संघ)
राष्ट्रीयत्वरशियन
राजकीय पक्षभविष्यातील रशिया
मागील इतर राजकीय पक्षयाब्लोको (२०००-२००७)
पत्नीयुलिया नवालनाया
निवासमॉस्को
व्यवसायवकील, भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते
सहीअलेक्सी नव्हाल्नीयांची सही
संकेतस्थळhttps://navalny.com

सुरुवातीचे जीवन

नवालनी यांचा जन्म बूत्यीन येथे युक्रेनियन वडील आणि रशियन आईच्या पोटी झाला. १९९३ मध्ये त्यांनी मॉस्कोमधील पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याची अभ्यास केला.१९९८ मध्ये ते पदवीधर झाले.[२] २००० मध्ये, नवालनी रशियन युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी, "याब्लोको" मध्ये सामील झाले.

कारकीर्द

ते त्यांच्या लाईव्हजर्नल या ब्लॉगद्वारे ओळखले गेले. २०१२ मध्ये, वॉल स्ट्रीट जर्नलने "व्लादिमीर पुतिनला ज्याला सर्वात घाबरते ती व्यक्ती" असे त्याचे वर्णन केले.[३] नवालनी हे रशियन विरोधी समन्वय समितीचे सदस्य आहेत. ते येल वर्ल्ड फेलो देखील आहेत.

२०१८ च्या निवडणुकीत ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात निवडणूक लढविली.[४]

२०२० विषप्रयोग आणि अटक

२० ऑगस्ट २०२० रोजी तोम्स्क, सायबेरिया येथून मॉस्कोला जाणाऱ्या उड्डाणादरम्यान नवालनी यांच्यावर विषबाप्रयोग झाला[५] आणि त्यांना ओम्स्कमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले.[६][७][८] On 7 September 2020, he woke up from the coma,[९] तो लवकरच व्हेंटिलेटरवर कोमात गेले. ७ सप्टेंबर २०२० रोजी, तो कोमातून जागे झाले आणि १४ सप्टेंबर रोजी, त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. त्यांना २२ सप्टेंबर रोजी रुग्णालयातून विमुक्त करण्यात आले.[१०]

१७ जानेवारी २०२१ रोजी, बर्लिन मध्ये उपचार झाल्यावर ते रशियात परतले, जिथे त्यांना निलंबित तुरुंगाच्या शिक्षेच्या अटींचे उल्लंघन करण्यासाठी अटक करण्यात आली.[११][१२]

संदर्भ