ऑलिंपस मॉन्स

मंगळ ग्रहावरील एक ज्वालामुखी

ऑलिम्पस मॉन्स तथा ऑलिम्पस पर्वत हा मंगळ ग्रहावरील एक मोठा ज्वालामुखी आहे. याची उंची अंदाजे २२,००० मीटर असून याला सूर्यमालेतील सगळ्यात उंच शिखर मानले जाते.[१] मंगळाच्या ॲमेझोनियन कालखंडात तयार झालेला हा ज्वालामुखी तेथील सगळ्यात कमी वयाचा ज्वालामुखी आहे. याला पूर्वी आल्बेडो फीचर, निक्स ऑलिम्पिका या नावांने ओळखले जायचे.

मंगळाच्या पश्चिम गोलार्धात असलेला हा ज्वालामुखी थार्सिस फुगवट्याच्या वायव्य कोपऱ्यात असून याचा पश्चिम भाग ॲमेझोनिस चौकोनात तर मध्य आणि पूर्वेकडील भाग थार्सिस चौकोनात आहे. या ज्वालामुखीवर कार्झोक क्रेटर आणि पांगबोचे क्रेटर हे उल्कापाताने तयार झालेले दोन खड्डे आहेत.[२]

फ्रांस आणि ऑलिम्पस मॉन्सच्या विस्ताराची तुलना
माउंट एव्हरेस्ट, मौना केआ आणि ऑलिम्पस मॉन्सच्या उंचीची तुलना]]

संदर्भ आणि नोंदी