जिनिव्हा सरोवर

स्वित्झर्लंड आणि फ्रान्समधील तलाव

जिनिव्हा सरोवर (फ्रेंच: Lac Léman, Léman, जर्मन: Genfersee) हे स्वित्झर्लंडफ्रान्स देशांच्या सीमेवरील आल्प्स पर्वतरांगेतील एक सरोवर आहे. ५८० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या ह्या सरोवराचा ५९.५३ टक्के भाग स्वित्झर्लंडच्या तर उर्वरित भाग फ्रान्सच्या अखत्यारीखाली येतो. जिनिव्हा सरोवराच्या भोवताली स्वित्झर्लंडची व्हो, व्हालेजिनिव्हा ही राज्ये तर रोन-आल्प हा फ्रान्सचा प्रदेश आहेत.

जिनिव्हा सरोवर
Lac Léman
  
जिनिव्हा सरोवर Lac Léman -
जिनिव्हा सरोवर
Lac Léman
-
स्थानपश्चिम युरोप
गुणक: 46°26′N 6°33′E / 46.433°N 6.550°E / 46.433; 6.550 6°33′E / 46.433°N 6.550°E / 46.433; 6.550
प्रमुख अंतर्वाहरोन नदी
प्रमुख बहिर्वाहरोन नदी
पाणलोट क्षेत्र७,९७५ चौ. किमी (३,०७९ चौ. मैल) वर्ग किमी
भोवतालचे देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
फ्रान्स ध्वज फ्रान्स
कमाल लांबी७३ किमी (४५ मैल)
कमाल रुंदी१४ किमी (८.७ मैल)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ५८०.०३
सरासरी खोली१५४.४ मी (५०७ फूट)
कमाल खोली३१० मी (१,०२० फूट)
पाण्याचे घनफळ८९ घन किमी
उंची३७२ मी (१,२२० फूट)
भोवतालची शहरेलोझान, जिनिव्हा

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हालोझान ही मोठी शहरे ह्याच सरोवराच्या काठावर वसलेली आहेत.

गॅलरी

फ्रेंच भाषेतील नकाशा
फ्रेंच भाषेतील नकाशा 
जिनिव्हामधील जे दो (Jet d'Eau) कारंजे
जिनिव्हामधील जे दो (Jet d'Eau) कारंजे 
स्वित्झर्लंडमधील मॉंत्रू
स्वित्झर्लंडमधील मॉंत्रू 
लाव्हू
लाव्हू 

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: