तिबेटी बौद्ध धर्म

तिबेटी बौद्ध धर्म बौद्ध धर्माच्या महायान शाखेची एक उपशाखा आहे जी तिबेट, मंगोलिया, भूतान, उत्तर नेपाळ, उत्तर भारताच्या लडाख, अरुणाचल प्रदेश, लाहौल व स्पीती जिल्हा आणि सिक्किम क्षेत्रांत, रशियाच्या काल्मिकिया, तुवा आणि बुर्यातिया क्षेत्रांत आणि आग्नेय चीनमध्ये प्रचलित आहे.[१] तिबेटी या संप्रदायाची धार्मिक भाषा आहे आणि याचे बहुतांश धर्मग्रंथ तिबेटी व संस्कृतमध्येच लिहिलेले आहेत. वर्तमानकाळात १४ वे दलाई लामा याचे सर्वात मोठे धार्मिक नेते आहेत.[२]

तिबेटच्या द्रेपुंग बौद्धमठात धार्मिक विवाद करताना दोन भिक्खू

पाच प्रमुख संप्रदाय

तिबेटी बौद्ध धर्माचे पाच प्रमुख संप्रदाय खालीप्रमाणे आहेत:

  • ञिङमा
  • कग्युद
  • सक्या
  • गेलुग्स
  • जोनङ

लोकसंख्या

मैत्रेय बुद्धाची मुर्ती, शिंगाट्स मधील तशिलहून्पो मठ

तिबेटमध्ये तिबेटी बौद्ध धर्माला मानणाऱ्यांची लोकसंख्या ८९ टक्के आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे