तुर्की भाषा

तुर्की भाषा (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे.[१] ही भाषा मुख्यत्वे तुर्कस्तान, सायप्रस तसेच इराक, ग्रीस, बल्गेरिया, मॅसिडोनिया, कोसोव्हो आणि आल्बेनियामध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.

तुर्की
Türkçe
स्थानिक वापरतुर्कस्तान, आल्बेनिया, अझरबैजान, कोसोव्हो, मॅसिडोनिया, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, मोल्दोव्हा व युरोपातील इतर अनेक देश
प्रदेशमध्यपूर्व, युरोप
लोकसंख्या८.३ कोटी
भाषाकुळ
लिपीलॅटिन (तुर्की प्रकार)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
Flag of the Turkish Republic of Northern Cyprus उत्तर सायप्रस
सायप्रस ध्वज सायप्रस
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१tr
ISO ६३९-२tur
भाषिक प्रदेशांचा नकाशा

सुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम मध्य आशियात झाला. ऑटोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोपमध्ये पसरली. भारतातही उर्दू भाषेतल्या गझलांमध्ये अनेक तुर्की शब्दांचा वापर असतो. अरबी, फार्सी आणि तुर्की शब्दांचे ज्ञान असेल तर उर्दू शायरी समजणे सोपे जाते.

संदर्भ आणि नोंदी

हे सुद्धा पहा