प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर

प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर (फ्रेंच: Provence-Alpes-Côte d'Azur; ऑक्सितान: Provença-Aups-Còsta d'Azur / Prouvènço-Aup-Costo d'Azur) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेला भूमध्य समुद्रमोनॅको तर पूर्वेला इटली हे देश आहेत.

प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर
Provence-Alpes-Côte d'Azur
फ्रान्सचा प्रदेश
चिन्ह

प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युरचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानीमार्सेल
क्षेत्रफळ३१,४०० चौ. किमी (१२,१०० चौ. मैल)
लोकसंख्या४९,५१,३८८
घनता१५८ /चौ. किमी (४१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-PAC
संकेतस्थळregionpaca.fr

प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर हा प्रदेश खालील भूभागांचा बनला आहे.

लोकसंख्या व अर्थव्यवस्था ह्या दोन्ही बाबतीत प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाचा फ्रान्समध्ये तिसरा क्रमांक लागतो (इल-दा-फ्रान्सरोन-आल्प खालोखाल).

शहरे

फ्रान्समधील खालील मोठी शहरे प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशात आहेत.

क्र.शहरविभागलोकसंख्या (शहर)महानगर
0मार्सेलबुश-द्यु-रोन८,५१,४२०१६,१८,३६९
0नीसआल्प-मरितीम३,४४,८७५९,९९,६७८
0तुलॉंव्हार१,६६,७३३६,००,७४०
0एक्स-ॲं-प्रोव्हॉंसबुश-द्यु-रोन१,४२,७४३मार्सेल
0आव्हियोंव्हॉक्ल्युझ१,१६,१०९३,९७,१४१
0ॲंतिबआल्प-मरितीम७६,९९४नीस
0कानआल्प-मरितीम७२,९३९नीस
0अ‍ॅर्लबुश-द्यु-रोन५२,७२९५३,०५७

विभाग

खालील सहा विभाग प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.

विभागचिन्हक्षेत्रफळलोकसंख्यामुख्यालयघनता
04आल्प-दा-ओत-प्रोव्हॉंस
६,९४४ चौरस किमी (२,६८१ चौ. मैल)१,५७,९६५दिन्य२३ प्रति किमी
05ओत-आल्प
५,५४९ चौरस किमी (२,१४२ चौ. मैल)१,३४,२०५गॅप२४ प्रति किमी
06आल्प-मरितीम
४,२९९ चौरस किमी (१,६६० चौ. मैल)१०,८४,४२८नीस२५२ प्रति किमी
13बुश-द्यु-रोन
५,११२ चौरस किमी (१,९७४ चौ. मैल)१९,६६,००५मार्सेल३८५ प्रति किमी
83व्हार
५,९७३ चौरस किमी (२,३०६ चौ. मैल)१०,०१,४०८तुलॉं१९६ प्रति किमी
84व्हॉक्ल्युझ
३,५६६ चौरस किमी (१,३७७ चौ. मैल)५,३८,९०२आव्हियों१५१ प्रति किमी


खेळ

खालील लीग १ फुटबॉल क्लब ह्या प्रदेशात स्थित आहेत.

वाहतूक

आल्प्स पर्वतराजीमध्ये भूमध्य समुद्राजवळ वसलेला हा प्रदेश युरोपातील एक मोठे पर्यटन क्षेत्र आहे. ह्यामुळे येथे रेल्वे व महामार्गांचे जाळे आहे. टीजीव्ही ही फ्रेंच रेल्वे कंपनी येथे अनेक मार्ग चालवते.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: