लीग १

व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा

लीग १ (फ्रेंच: Ligue 1) ही फ्रान्स देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. फ्रान्समधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग लोकप्रियतेमध्ये युरोपात सहाव्या क्रमांकावर आहे. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये फ्रान्समधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी लीग २ ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर लीग २ मधील सर्वोत्तम ३ संघांना लीग १ मध्ये बढती मिळते.

लीग १
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
मंडळयुएफा
स्थापनाइ.स. १९३२
संघांची संख्या२०
देशामधील पातळीसर्वोच्च
खालील पातळीलीग २
राष्ट्रीय चषककुप दे फ्रान्स
त्रोफी दे शांपियों
आंतरराष्ट्रीय चषकयुएफा चँपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेतेपॅरिस सें-जर्मेन एफ.सी. (३ रे विजेतेपद)
(२०१२-१३)
सर्वाधिक अजिंक्यपदेए.एस. सेंत-एत्येन (१० विजेतेपदे)
संकेतस्थळligue1.com
२०१३-१४

१९३२ सालापासून खेळवल्या जात असलेल्या ह्या स्पर्धेचे नाव २००२ सालापर्यंत डिव्हिजन १ असे होते. आजवर ७६ फ्रेंच लीग १ मध्ये सहभाग घेतला असून ए.एस. सेंत-एत्येनने आजवर १० वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

सद्य संघ

२०१३-१४ लीग १ हंगामामधील २० संघांचे स्थान
संघशहर
ए.सी. अझाक्सियोअझाक्सियो
एस.सी. बास्तियाबास्तिया
एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दूबोर्दू
एव्हियां टी.जी.ॲन्सी, ऑत-साव्वा
एन अवांत दे गिगांगिगां, कोत-द'आर्मोर
लील ओ.एस.सी.लील
एफ.सी. नाँतनाँत
ऑलिंपिक ल्योंल्यों
ऑलिंपिक दे मार्सेलमार्सेल
माँपेलिये एच.एस.सी.माँपेलिये
ओ.जी.सी. नीसनीस
पॅरिस सें-जर्मेन एफ.सी.पॅरिस (पार्क दे प्रेंस)
ए.एस. मोनॅको एफ.सी.मोनॅको
स्ताद ऱ्हेन एफ.सी.ऱ्हेन
स्ताद दे रेंसरेंस
ए.एस. सेंत-एत्येनसेंत-एत्येन
तुलूझ एफ.सी.तुलूझ
व्हालेंस्येन एफ.सी.व्हालेस्येंन, नोर
एफ.सी. लोरीयांलोरीयां, मॉर्बियां
एफ.सी. सोशॉ-माँबेल्यारमाँबेल्यार, दूब

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत