भारतीय गेंडा

भारतीय गेंडा किंवा एकशिंगी गेंडा (Rhinoceros unicornis) ही एक गेंड्याची प्रजाती आहे. गेंडा अथवा इंग्रजीत ऱ्हाईनोसेरॉस हा एक जंगली शाकाहारी प्राणी आहे. सध्या जगात गेंड्याच्या पाच प्रजाती अस्तित्वात आहेत. हा एक खुरधारी वर्गातील प्राणी असून, याचा गण अयुग्मखुरी आहे. अयुग्मखुरी म्हणजे ज्या प्राण्यांच्या पायाला विषम संख्येत खूर असतात ते प्राणी. अयुग्मखुरी गणात गेंडा हा खड्गाद्य कुळात मोडणारा एकमेव प्राणि आहे. या प्राण्याच्या पायाला तीन खुरे असतात. अयुग्मखुरी प्राण्यांना शिंगे नसतात. त्यानुसार गेंड्याचे शिंग हे खरे शिंग नसून ते एक केरोटीन नावाच्या (एक तंतुमय प्रोटीन) पदार्थापासून बनलेले आहे.[२][३]

एकशिंगी गेंडा
भारतीय गेंडा
Early Pleistocene–Recent
PreЄ
Є
O
S
D
C
P
T
J
K
Pg
N

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी:प्राणी
वंश:कणाधारी
जात:सस्तन
वर्ग:शाकाहारी
गण:अयुग्मखुरी
कुळ:खड्गाद्य
जातकुळी:ऱ्हाईनोसेरॉस
जीव:युनिकॉर्नी
शास्त्रीय नाव
ऱ्हिनोसेरॉस युनिकॉर्नी
कार्ल लिनेयस, (१७५८)
भारतीय गेंड्याचा आढळप्रदेश
भारतीय गेंड्याचा आढळप्रदेश

भारतात काझीरंगा येथे मोठ्या प्रमाणात भारतीय गेंडे मिळतात. एक शिंगी गेड्यासाठी काझीरंगा जगभर प्रसिद्ध आहे. जगातील २/३ भारतीय गेंडे काझीरंगा येथे आढळतात. एक शिंगी गेंडे अथवा भारतीय गेंडे भारतात आसाम, पश्चिम बंगालउत्तर प्रदेश या प्रांतांमध्ये आढळतात, तर काही प्रमाणात नेपाळमध्ये पण दिसतात..[२][३]

संदर्भ