मेलानिया ट्रम्प

मेलानिया ट्रम्प [a] (२६ एप्रिल, १९७०:नोव्हो मेस्तो, स्लोव्हेनिया, युगोस्लाव्हिया - ) या स्लोव्हेनियन-अमेरिकन मॉडेल आणि धंदेवाईक महिला आहे. या डॉनल्ड ट्रम्प यांच्या पत्नी म्हणून २०१७-२०२१ दरम्यान अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या.

मेलानिया ट्रम्पचे लहानपण स्लोव्हेनिया (तेव्हा युगोस्लाव्हियाचा भाग) मध्ये गेले. त्यांनी मिलान आणि पॅरिस तसेच १९९६ पासून न्यू यॉर्क शहरात फॅशन मॉडेल म्हणून काम केले. २००५मध्ये त्यांनी दूरचित्रवाणी व्यक्तिमत्व आणि स्थावर मिळकतींचा व्यापारी डॉनल्ड ट्रम्प यांच्याशी लग्न केले. त्यांना २००६मध्ये बॅरॉन नावाचा मुलगा झाला. त्यानंतर लगेचच त्यांनी अमेरिकन नागरिकत्व घेतले लुईसा अॅडम्स नंतर अमेरिकेत न जन्मलेल्या त्या दुसऱ्या अमेरिकन प्रथम महिला तर इंग्लिश मातृभाषा नसलेल्या पहिल्या आहेत. [b]

आपल्या पतीची सद्दी संपल्यानंतर मेलानिया ट्रम्प सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत. [१]

पूर्वजीवन, कुटुंब आणि शिक्षण

मेलानिया ट्रम्पचा जन्म मेलानिया क्नेव्ह्स नावाने नोव्हो मेस्टो, युगोस्लाव्हिया येथे झाला. युगोस्लाव्हियाचे विघटन झाल्यावर हे शहर स्लोव्हेनियाचा भाग झाले.[२] [३] तिचे वडील, व्हिक्टर क्नेव्ह्स सरकारी मालकीच्या वाहन निर्मात्या कंपनीच्या विक्रीस्थळांचे व्यवस्थापन करीत असत. [४] [५] तिची आई अमालिया सेव्हनिका येथील मुलांच्या कपड्यांवरील चित्रणे तयार करीत असे. [६] [७] सेव्हनिकामध्येच हे कुटुंब सरकारी गृहनिर्माण संकुल मध्ये राहत असे. [८]

मॉडेलिंग कारकीर्द

युरोप

२०११ मध्ये मेलानिया ट्रम्प

मेलानियाने १५व्या वर्षी तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीला सुरुवातीस आपले क्नेव्हस हे आडनाव बदलून जर्मन वाटणारे क्नाउस असे करून घेतले. तिने काम शोधण्यासाठी युरोप धुंडाळले. [८] स्लोव्हेनियन फॅशन फोटोग्राफर स्टेन जेर्कोकडून छायाचित्रे काढून घेतल्यावर क्नाउसला सोळाव्या वर्षी व्यावसायिक काम मिळण्यास सुरुवात झाली. [९] [१०] अठराव्या वर्षी तिने मिलान, इटली येथील मॉडेलिंग एजन्सीशी करार केला. [११] क्नाउसने पॅरिस आणि मिलानमधील कंपन्यांसाठी मॉडेलिंग केले. तेथेच त्यांना आपले भावी पती डॉनल्ड ट्रम्पचा मित्र भेटला. त्याने क्नाउसला अमेरिकेत जाण्याचा सल्ला दिला. [१२] क्नाउस १९९६मध्ये मॅनहॅटनला गेल्या. [१२] [१३]

क्नाउसने १९९६मध्ये मॅक्स नियतकालिकाच्या जानेवारी १९९६ च्या अंकासाठी अर्धनग्न छायाचित्रे काढून दिली. [१४] त्यांनी जीक्यू मासिकाच्या जानेवारी २००० आवृत्तीमध्ये नग्न छायाचित्रे देखील छापवून आणली.[१५] डॉनल्ड ट्रम्पच्या मते असे करणे वेगळे किंवा गैर नाही. [१६] [१७]

न्यू यॉर्क

१९९९मध्ये डॉनल्ड ट्रम्प आणि मेलानिया क्नाउस

१९९६मध्ये मॅनहॅटनला आल्यावर ती[८] छायाचित्रकार मॅथ्यू एटानियनसोबत रहात असे. [१२] ती अमेरिकेत पर्यटन व्हिसा घेउन आली होती व त्यानुसार तिला काम करण्याची परवानगी नव्हती. असे असताही तिने सुमारे दहा ठिकाणी मॉडेलिंग करून २०,००० अमेरिकन डॉलर मिळवले. कालांतराने तीने एच-१बी व्हिसा घेतला.[८] [१८]

सप्टेंबर १९९८मध्ये, क्नाउस एका पार्टीत तत्कालीन-व्यापारी डॉनल्ड ट्रम्पला भेटल्या आणि त्यांनी एकमेकांना भेटणे सुरू ठेवले. [१९] त्यावेळी डॉनल्ड ट्रम्प आपल्या दुसऱ्या पत्नी मार्ला मेपल्सपासून घटस्फोट घेण्याच्या खटल्यात होते. [२०] [२१] क्नाउस आणि ट्रम्प यांनी १९९९ हॉवर्ड स्टर्नच्या दूरचित्रवाणी कार्यक्रमात अश्लील मुलाखत देउन आपल्याकडेलक्ष वेधून घेतले. [५] [२२]

लग्न

२०००मध्ये कायली बॅक्स, डॉनल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन (त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष), आणि मेलानिया क्नाउस

क्नाउस आणि ट्रम्प यांचा साखरपुडा २००४ मध्ये झाला आणि २२ जानेवारी, २००५ रोजी, त्यांनी फ्लोरिडामधील पाम बीच शहरातील चर्चमध्ये अँग्लिकन पद्धतीने लग्न केले.[२३] [२४] हे तिचे पहिले आणि डॉनल्ड ट्रम्पचे तिसरे लग्न होते. [२४] [२५]

२० मार्च, २००६ रोजी तिने त्यांचा मुलगा बॅरन विल्यम ट्रम्पला जन्म दिला. [२६] [२७] याला अँकर बेबी असे म्हणले गेले आहे. या शिवाय तिला चार सावत्र मुले आहेत -- डॉनल्ड ट्रम्प जुनियर आणि एरिक ट्रम्प आणि सावत्र मुलगी इव्हान्का ट्रम्प हे डॉनल्डच्या पहिल्या बायको इव्हाना झेल्निकोवा पासून तर टिफनी ट्रम्प यांनी मार्ला मेपल्सशी केलेल्या दुसऱ्या लग्नापासून.

क्नाउस जुलै २००६ मध्ये अमेरिकन नागरिक झाल्यानंतर तिने आपले आई आणि वडीलांना नागरिक करून घेतले. इतरांनी केलेल्या या प्रकारच्या चेन मायग्रेशन विरुद्ध प्रचार करून डॉनल्ड ट्रम्पने मते मिळवली. [२८] [२९] [२८] [३०]

नोव्हेंबर 2015 मध्ये पती डॉनल्ड आणि मुलगा बॅरनसह प्रचार कार्यक्रमात

फेब्रुवारी २०१७मध्ये मेलानिया ट्रम्पने डेली मेल आणि जनरल ट्रस्ट या डेली मेल नावाच्या ब्रिटीश टॅब्लॉइडच्या मालकावर खटला दाखल केला. ऑगस्ट २०१६ च्या लेखात मेलानियाने अनेक वर्षांपूर्वी एस्कॉर्ट सेवेसाठी (धंदेवाईक सोबतीण) काम केल्याचा दावा केल्याने तिचे नुकसान झाले त्याबद्दल तिने १५ कोटी अमेरिकन डॉलरची भरपाई मागितली. एप्रिल २०१७मध्ये डेली मेलने आपला दावा खरा नसल्याचे म्हणले व २९ लाख डॉरची भरपाई दिली.[३१] [३२] [३३] [३४]

अमेरिकेची प्रथम महिला (२०१७-२०२१)

मेलानिया ट्रम्प २० जानेवारी, २०१७ रोजी अमेरिकेच्या प्रथम महिला झाल्या. [३५] [३६] त्यांनी व्हाइट हाउसमध्ये आपल्या पती बरोबर न राहता मॅनहॅटनमध्ये ट्रम्प टॉवरमध्ये आपला मुलगा बॅरनसोबत राहणे पसंत केले. [३७] [३८] वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टर मेरी जॉर्डनने २०२०मध्ये लिहिलेल्या चरित्रात हे उघडकीस आले की मेलानिया तिच्या आणि त्यांच्या मुलासाठी ट्रम्प यांच्या विवाहपूर्व करारामध्ये आपला फायदा करून घेण्यासाठी न्यू यॉर्कमध्ये राहिली. [३९]

नोंदी

संदर्भ


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.