यांगत्से

यांगत्से (पारंपरिक चिनी लिपी: 長江 ; सोपी चिनी लिपी: 长江 ; फीन्यिन: Yangtze ; अर्थ: लांब नदी ;) ऊर्फ छांग च्यांग (चिनी: 长江/長江 ; फीन्यिन: Cháng Jiāng;) ही आशियातील सर्वांत लांब व जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे (नाईलअ‍ॅमेझॉन खालोखाल). संपूर्णपणे चीन देशामधून वाहणारी यांगत्से नदीची लांबी ६,३०० किलोमीटर (३,९१५ मैल) आहे.

यांगत्से (长江)
यांगत्से नदीवर पहाटेची वेळ
इतर नावेचांग जियांग
उगमगेलादेंतॉंग शिखर, छिंगहाय
33°25′44″N 91°10′57″W / 33.42889°N 91.18250°W / 33.42889; -91.18250
मुखपूर्व चीन समुद्र
शांघाय, च्यांग्सू
31°23′37″N 121°58′59″W / 31.39361°N 121.98306°W / 31.39361; -121.98306
पाणलोट क्षेत्रामधील देशचीन
लांबी६,३०० किमी (३,९०० मैल)
उगम स्थान उंची५,०४२ मी (१६,५४२ फूट)
सरासरी प्रवाह३०,१६६ घन मी/से (१०,६५,३०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ१८,०८,५००
चीनच्या नकाशावर यांगत्से नदी

थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वांत मोठे जलविद्युत निर्मिती करणारे धरण ह्याच नदीवर बांधण्यात आलेले आहे.

मोठी शहरे

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: