व्हिक्टोरिया अझारेन्का


व्हिक्टोरिया अझारेन्का (बेलारूशियन: Вікторыя Азарэнка; ३१ जुलै १९८९, मिन्स्क) ही एक बेलारूशियन टेनिसपटू आहे. अझारेन्काने आजवर दोन एकेरी (२०१२२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन), २ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा (२००७ यू.एस. ओपन२००८ फ्रेंच ओपन) तसेच १५ एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१२ सालची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून ती जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर पोचली.

व्हिक्टोरिया अझारेन्का
व्हिक्टोरिया अझारेन्का
व्हिक्टोरिया अझारेन्का
देशबेलारूस ध्वज बेलारूस
वास्तव्यस्कॉट्सडेल, फीनिक्स महानगर, अमेरिका
जन्म३१ जुलै, १९८९ (1989-07-31) (वय: ३४)
मिन्स्क, बेलारूशियन सोसाग, सोव्हिएत संघ (आजचा बेलारूस)
उंची१.८० मी (५ फु ११ इं)
सुरुवात२००३
शैलीएकहाती फोरहॅंड, दोन-हाती बॅकहॅंड, उजव्या हाताने
बक्षिस मिळकत$१९,३३४,९२८
एकेरी
प्रदर्शन३५७ - १३२
अजिंक्यपदे१५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२०१२, २०१३)
फ्रेंच ओपनउपांत्यपूर्व फेरी (२००९, २०११)
विंबल्डनउपांत्यफेरी (२०११)
यू.एस. ओपन४थी फेरी (२००७)
दुहेरी
प्रदर्शन185–73
शेवटचा बदल: फेब्रु. २०१३.

वयाच्या चौदाव्या वर्षापासून अझारेन्का अमेरिकेमधील फीनिक्स शहराच्या स्कॉट्सडेल ह्या उपनगरात राहते. टेनिस खेळताना तोंडामधून जोरजोरात आवाज काढण्याच्या सवयीसाठी अझारेन्कावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. २०११ विंबल्डन दरम्यान अझारेन्का ९५ डेसिबल इतक्या आवाजात किंचाळत होती.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

महिला एकेरी

निकालवर्षस्पर्धाकोर्ट प्रकारप्रतिस्पर्धीस्कोअर
विजयी२०१२ऑस्ट्रेलियन ओपनहार्ड मारिया शारापोव्हा6–3, 6–0
उप-विजयी२०१२यू.एस. ओपनहार्ड सेरेना विल्यम्स2–6, 6–2, 5–7
विजयी२०१३ऑस्ट्रेलियन ओपन (2)हार्ड ली ना4–6, 6–4, 6–3

बाह्य दुवे

मागील
कॅरोलिन वॉझ्नियाकी
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
३० जानेवारी २०१२ - चालू
पुढील
सध्याची