अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ

अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (स्पॅनिश: Aeropuerto Adolfo Suárez Madrid-Barajas) (आहसंवि: MADआप्रविको: LEMD) हा स्पेन देशाच्या माद्रिद शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२८ साली उघडलेला व माद्रिदपासून केवळ ९ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील सर्वात वर्दळीचा तर युरोपमध्ये सहाव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ
Aeropuerto Adolfo Suárez Madrid-Barajas (स्पॅनिश)
आहसंवि: MADआप्रविको: LEMD
MAD is located in स्पेन
MAD
MAD
स्पेनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
मालकविन्ची समूह
कोण्या शहरास सेवामाद्रिद, माद्रिद संघ
हबआयबेरिया
एर युरोपा
एर नॉस्ट्रम
समुद्रसपाटीपासून उंची२००० फू / ६१० मी
गुणक (भौगोलिक)40°28′20″N 3°33′39″W / 40.47222°N 3.56083°W / 40.47222; -3.56083
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
14R/32L13,4514,100डांबरी
18L/36R11,4823,500डांबरी
14L/32R11,4823,500डांबरी
18R/36L14,2684,349डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी४,१८,३३,३७४
मालवाहतूक३,६६,६४५ टन
विमाने३,४२,६०१
स्रोत: प्रवासी वाहतूक, AENA[१]
येथून निघालेले एर फ्रान्सचे एरबस ए३२० विमान

२०१४ साली माद्रिद विमानतळाला स्पेनचा दिवंगत पंतप्रधान अदोल्फो सुआरेझ ह्याचे नाव देण्यात आले. हा विमानतळ माद्रिद मेट्रो ह्या जलद परिवहन प्रणालीने माद्रिद शहरासोबत जोडला गेला आहे.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे