इस्रायलचे पंतप्रधान

इस्रायलचे पंतप्रधान हे इस्रायल देशाचे शासनप्रमुख आहेत व इस्रायली राजकारणात सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. पंतप्रधानांची नियुक्ती इस्रायलचे राष्ट्रपती करतात. १४ मे १९४८ला इजरायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणे नंतर डेव्हिड बेन-गुरियन इस्रायलच्या अस्थायी सरकारचे नेता म्हणून पंतप्रधान झाले व पहिल्या निवडणुकीत तेच निवडुन आले. गोल्डा मायर या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. ३१ मार्च २००९ पासुन बिन्यामिन नेतान्याहू सध्याचे पदस्त पंतप्रधान आहेत. पंतप्रधान असताना लेव्हि एश्कॉल यांचे निधन झाले (१९६९) व यित्झाक राबिन यांची हत्या (१९९५) करण्यात आली.

इस्रायलचे पंतप्रधान
इस्रायलचे पंतप्रधानांचा ध्वज
विद्यमान
बिन्यामिन नेतान्याहू

२९ डिसेंबर २०२२ पासून
शैलीमहामहिम
नियुक्ती कर्ताइस्रायलचे राष्ट्रपती
कालावधी४ वर्ष (कमाल)
निर्मिती१४ मे १९४८
पहिले पदधारकडेव्हिड बेन-गुरियन
संकेतस्थळpmo.gov.il

पात्रता, अधिकार आणि कर्तव्ये

इस्त्रायलची लिखीत राज्यघटना नाही; पण अनेक मूलभूत कायदे आहेत जे एखाद्या देशाच्या राज्यघटने सारखे महत्त्वाचे आहेत. इस्रायलचे पंतप्रधान हे इस्रायलचे नागरिक असणे व ते क्नेसेट मध्ये निवडुन यावे गरजेचे आहे. पंतप्रधान व इतर मंत्रीमंडळ मिळुन इस्रायलचे सरकार बनते. उपपंतप्रधान या पदाची पण सोय पण मूलभूत कायद्यात आहे. निवडणुकी नंतर पंतप्रधान होण्यासाठी बहुसंख्य पाठींबा असलेला व्यक्ति इस्रायलच्या राष्ट्रपतींकडे आपली उमेदवारी देतो आणि निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्या नंतर सात दिवसाच्या आत राष्ट्रपती पंतप्रधान जाहिर होतो. पंतप्रधानांच्या मृत्युच्या वेळी हा कालावधी चौदा दिवसांचा असतो ज्यात नव्या अथवा प्रभारी पंतप्रधानाची नियुक्ती होते.[१]

यादी

एकूण बारा लोक इस्रायलचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. इजरायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणापत्र वर १४ मे १९४८ला स्वाक्षरी करण्यात आले. त्यानंतर डेव्हिड बेन-गुरियन इस्रायलच्या अस्थायी सरकारचे नेता म्हणून १४ मे १९४८ ते १० मार्च १९४९ पंतप्रधान होते. पंतप्रधानांच्या पहिल्या निवडणुकीत बेन-गुरियन निवडले गेले. पुढे अनेक वेळा ते निवडुन आले. २६ जानेवारी १९५४ पदभार सांभाळणारे मोशे शॅरेड हे इस्रायलचे दुसरे पंतप्रधान ठरले. ३ नोव्हेंबर १९५५ला बेन-गुरियन पुन्हा विजयी ठरले. व एकूण १३ वर्ष आणि १२७ दिवस ते पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. इस्रायलचे पंतप्रधान म्हणून पदस्त असण्याचा हा सर्वात जास्त कालावधी आहे. तिसरे पंतप्रधान लेव्हि एश्कॉल २६ जून १९६३ पासुन त्यांच्या मृत्यू पर्यंत, २६ फेब्रुवारी १९६९, पदस्त होते. त्यांच्या निधनानंतर यिगाल एलोन हे प्रभारी पंतप्रधान झाले ज्यानंतर गोल्डा मायर ह्या १७ मार्च १९६९ला देशाच्या चौथ्या पंतप्रधान झाल्या. मायर देशाच्या पहिल्या व आजतागायत एकमेव महिला पंतप्रधान होत्या. १९९५ मध्ये यित्झाक राबिन पंतप्रधान पदी असताना तेल अवीवला एका शांतता रॅली मध्ये त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली.[२]

खालील नमुद केलेली पंतप्रधानांची यादी आहे:[३]

रंगदल
मपई / इस्रायली लेबर पार्टी / अलाइनमेंट (इस्रायल)
लिकुड
कदिमा
यमीना
क्र.नाव
(जन्म–मृत्यू)
चित्रराजकीय पक्षकार्यकालनियुक्त
(क्नेसेट)
डेव्हिड बेन-गुरियन
(१८८६–१९७३)
मपई१४ मे १९४८१० मार्च १९४९
१० मार्च १९४९१ नोव्हेंबर १९५०१९४९ (१वे)
१ नोव्हेंबर १९५०८ ऑक्टोबर १९५१
८ ऑक्टोबर १९५१२४ डिसेंबर १९५२१९५१ (२वे)
२४ डिसेंबर १९५२२६ जानेवारी १९५४
मोशे शॅरेड
(१८९४-१९६५)
मपई२६ जानेवारी १९५४२९ जून १९५५
२९ जून १९५५३ नोव्हेंबर १९५५
()डेव्हिड बेन-गुरियन
(१८८६-१९७३)
मपई३ नोव्हेंबर १९५५७ जानेवारी १९५८१९५५ (३वे)
७ जानेवारी १९५८१७ डिसेंबर १९५९
१७ डिसेंबर १९५९२ नोव्हेंबर १९६११९५९ (४वे)
२ नोव्हेंबर १९६१२६ जून १९६३१९६१ (५वे)
लेव्हि एश्कॉल
(१८९५-१९६९)
मपई२६ जून १९६३२२ डिसेंबर १९६४
२२ डिसेंबर १९६४१२ जानेवारी १९६६
अलाइनमेंट (इस्रायल)
मपई/इस्रायली लेबर पार्टी
१२ जानेवारी १९६६२६ फेब्रुवारी १९६९१९६५ (६वे)
यिगाल एलोन
(प्रभारी)
(१९१८–१९८०)
अलाइनमेंट (इस्रायल)
इस्रायली लेबर पार्टी
२६ फेब्रुवारी १९६९१७ मार्च १९६९
गोल्डा मायर
(१८९८-१९७८)
अलाइनमेंट (इस्रायल)
इस्रायली लेबर पार्टी
१७ मार्च १९६९१५ डिसेंबर १९६९
१५ डिसेंबर १९६९१० मार्च १९७४१९६९ (७वे)
१० मार्च १९७४३ जून १९७४१९७३ (८वे)
यित्झाक राबिन
(१९२२-१९९५)
अलाइनमेंट (इस्रायल)
इस्रायली लेबर पार्टी
३ जून १९७४२० जून १९७७
मेनाकेम बेगिन
(१९१३-१९९२)
लिकुड२० जून १९७७५ ऑगस्ट १९८११९७७ (९वे)
५ ऑगस्ट १९८११० ऑक्टोबर १९८३१९८१ (१०वे)
यित्झाक शामिर
(१९१५-२०१२)
लिकुड१० ऑक्टोबर १९८३१३ सप्टेंबर 1984
शिमॉन पेरेझ
(१९२३-२०१६)
अलाइनमेंट (इस्रायल)
इस्रायली लेबर पार्टी
१३ सप्टेंबर १९८४२० ऑक्टोबर १९८६१९८४ (११वे)
()यित्झाक शामिर
(१९१५-२०१२)
लिकुड२० ऑक्टोबर १९८६२२ डिसेंबर १९८८
२२ डिसेंबर १९८८११ जून १९९०१९८८ (१२वे)
११ जून १९९०१३ जुलै १९९२
()यित्झाक राबिन
(१९२२-१९९५)
इस्रायली लेबर पार्टी१३ जुलै १९९२४ नोव्हेंबर १९९५[२]१९९२ (१३वे)
()शिमॉन पेरेझ
(१९२३-२०१६)
इस्रायली लेबर पार्टी(प्रभारी, ४ नोव्हेंबर १९९५)
२२ नोव्हेंबर १९९५
१८ जून १९९६
बिन्यामिन नेतान्याहू
(१९४९–)
लिकुड१८ जून १९९६६ जुलै १९९९१९९६१४वे
१०एहूद बराक
(१९४२–)
वन इस्रायल
इस्रायली लेबर पार्टी
६ जुलै १९९९७ मार्च २००११९९९१५वे


११
एरियेल शॅरन
(१९२८-२०१४)
लिकुड७ मार्च २००१२८ फेब्रुवारी २००३२००१
२८ फेब्रुवारी २००३२१ नोव्हेंबर २००५२००३ (१६वे)
कदिमा२१ नोव्हेंबर २००५(४ जानेवारी २००६)
१४ एप्रिल २००६
१२एहूद ओल्मर्ट
(१९४५–)
कदिमा(प्रभारी, ४ जानेवारी २००६)
१४ एप्रिल २००६
४ मे २००६
४ मे २००६३१ मार्च २००९२००६ (१७वे)
()बिन्यामिन नेतान्याहू
(१९४९–)
लिकुड३१ मार्च २००९१८ मार्च २०१३२००९ (१८वे)
१८ मार्च २०१३६ मे २०१५२०१३ (१९वे)
६ मे २०१५[४]९ एप्रिल २०१९२०१५ (२०वे)
९ एप्रिल २०१९१७ मे २०२०एप्रिल २०१९ (२१वे)
सप्टेंबर २०१९ (२२वे)
१७ मे २०२०१३ जून २०२१२०२० (२३वे)
१३नफ्ताली बेनेट
(१९७२–)
यमीना१३ जून २०२१३० जून २०२२२०२१ (२४वे)
१४याइर लापिड
(१९६३–)
येश अटिड१ जुलाई २०२२पदस्ठ

संदर्भ