डॉमिनिका


डॉमिनिका हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. हा देश कॅरिबियन समुद्रामध्ये ग्वादेलोपच्या दक्षिणेस व मार्टिनिकच्या उत्तरेस ७५० चौरस किमी क्षेत्रफळाच्या बेटावर वसला असून २००१ साली येथील लोकसंख्या केवळ ७१,२९३ इतकी होती. रुसाउ ही डॉमिनिकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

डॉमिनिका
Commonwealth of Dominica
डॉमिनिकाचे राष्ट्रकुल
डॉमिनिकाचा ध्वजडॉमिनिकाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "Après Bondie, C'est La Ter" (ॲंटिलियन क्रियोल)
"Après le Bon Dieu, c'est la Terre" (फ्रेंच)
राष्ट्रगीत: Isle of Beauty, Isle of Splendour
डॉमिनिकाचे स्थान
डॉमिनिकाचे स्थान
डॉमिनिकाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
रुसाउ
अधिकृत भाषाइंग्लिश
इतर प्रमुख भाषाफ्रेंच
सरकारसांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखएल्युड विल्यम्स
 - पंतप्रधानरूझवेल्ट स्केरिट
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस३ नोव्हेंबर १९७८ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण७५० किमी (१८४वा क्रमांक)
 - पाणी (%)१.६
लोकसंख्या
 -एकूण७१,२९३ (१९५वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१०५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण९७.७ कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१३,८१५ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७२४ (उच्च) (७३ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलनपूर्व कॅरिबियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभागअटलांटिक प्रमाणवेळ (यूटीसी - ४:००)
आय.एस.ओ. ३१६६-१DM
आंतरजाल प्रत्यय.dm
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक१-७६७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

क्रिस्तोफर कोलंबसने हे बेट ३ नोव्हेंबर १४९२ रोजी शोधुन काढले व त्याला ह्या दिवसाचे (रविवार, लॅटिनमध्ये: dominica) नाव दिले. त्यानंतर अनेक शतके येथे फारशी वस्ती नव्हती. फ्रान्सने १७६३ साली हे बेट ब्रिटनच्या स्वाधीन केले. ब्रिटनने येथे एक छोटी वसाहत स्थापन केली. ३ नोव्हेंबर १९७८ रोजी डॉमिनिकाला स्वातंत्र्य मिळाले. सध्या डॉमिनिका राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे सांसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. ह्या भागातील प्रजासत्ताक असणाऱ्या कमी देशांपैकी डॉमिनिका एक आहे.

येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटन हा डोमिनिकामधील सर्वात मोठा उद्योग आहे. येथील दरडोई उत्पन्न कॅरिबियनमधील इतर देशांच्या तुलनेत बरेच कमी आहे.

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: