महाराष्ट्र शासन

भारतातील राज्य सरकार

महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) हे महाराष्ट्र राज्यासाठी घटनात्मक राज्य शासित प्राधिकरण आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. हे एक लोकशाही पद्धतीने निवडून चालणारे सरकार आहे, ज्यामध्ये दर ५ वर्षांनी २८८ आमदार विधानसभेवर निवडून जातात. महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन सभागृहे आहेत विधानसभा (कनिष्ट सभागृह) आणि विधान परिषद (वरिष्ट सभागृह). महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एकूण ७८ आमदार आहेत, त्यापैकी ६६ आमदार हे निवडून तर १२ आमदार नामनिर्देशित असतात.[१] भारताच्या संसदीय व्यवस्थेप्रमाणेच कनिष्ट सभागृहात म्हणजेच विधानसभेत बहुमत असणारा पक्ष किंवा पक्षांचा गटच सरकार स्थापन करु शकतो. विधानसभेत बहुमताचे नेतृत्व करणारा नेताच मुख्यमंत्री बनतो आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यामधून मंत्रीमंडळाची नियुक्ती केली जाते आणि विविध मंत्रालयाचा कारोभार या मंत्र्यांकडे सोपवला जातो. निवडून न आलेली व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यास, त्यांना पुढील ६ महिन्यांच्या आत कोणत्याही सभागृहात निवडून येणे बंधनकारक असते.[२] भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो.[३] एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.[४]

महाराष्ट्र शासन
महाराष्ट्राचे राज्यचिन्ह
स्थापना1 मे 1960; 63 वर्षां पूर्वी (1960-०५-01)
देशभारतीय गणराज्य
संकेतस्थळmaharashtra.gov.in
स्थानराज्यभवन, मुंबई
विधिमंडळ
विधिमंडळमहाराष्ट्र विधिमंडळ
वरिष्ठ सभागृहमहाराष्ट्र विधान परिषद
सभापतीनीलम गोऱ्हे (शिवसेना-शिंदे) (अतिरिक्त जबाबदारी)
उपसभापतीनीलम गोऱ्हे (शिवसेना-शिंदे)
सभागृह नेतेदेवेंद्र फडणवीस (भाजप)
(महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री)
सभागृह उपनेतेउदय सामंत (शिवसेना-शिंदे) (कार्यवाहू)
विरोधी पक्षनेतेअंबादास दानवे (शिवसेना-ठाकरे)
उप विरोधी पक्षनेतेभाई जगताप (राष्ट्रीय काँग्रेस)
कनिष्ठ सभागृहमहाराष्ट्र विधानसभा
अध्यक्षराहुल नार्वेकर (भाजप)
उपाध्यक्षनरहरी झिरवळ (राष्ट्रवादी-अजित पवार)
सभागृह नेतेएकनाथ शिंदे (शिवसेना-शिंदे)
(महाराष्ट्राचे मुख्यमंत्री)
सभागृह उपनेते
विरोधी पक्षनेतेविजय नामदेवराव वडेट्टीवार (राष्ट्रीय काँग्रेस)
उप विरोधी पक्षनेते
बैठक स्थानविधिमंडळ
कार्यकारी
राज्यप्रमुखरमेश बैस (भाजप)
(महाराष्ट्राचे राज्यपाल)
शासनप्रमुखएकनाथ शिंदे (शिवसेना-शिंदे)
(महाराष्ट्राचे मुख्यमंत्री)
शासन उपप्रमुख
नागरी सेवा प्रमुखडॉ. नितीन करीर भाप्रसे
(महाराष्ट्राचे मुख्य सचिव)
राज्य मंत्रिमंडळएकनाथ शिंदे मंत्रीमंडळ
मंत्रालय (शासन विभाग)68
बैठक स्थानमंत्रालय, मुंबई
मंत्री सदस्यांची एकूण संख्या
  • (मुख्यमंत्री ०१)
  • (उपमुख्यमंत्री ०२)
  • (कॅबिनेट मंत्री २६)
  • (राज्यमंत्री ००)
  • एकूण = २९
याला उत्तरदायीमहाराष्ट्र विधानसभा
न्यायमंडळ
न्यायालयमुंबई उच्च न्यायालय
सरन्यायाधिशदेवेंद्र कुमार उपाध्याय

प्रमुख घटनात्मक पदे

अनुक्रमपदपदस्थचित्रपासून
१.राज्यपालरमेश बैस १८ फेब्रुवारी २०२३
२.मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे [४]
३० जून २०२२
३.उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसअजित पवार ३० जून २०२२
४.सभापती महाराष्ट्र विधान परिषदनीलम गोऱ्हे (कार्यवाहू)-८ जुलै २०१६
५.अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभाराहुल नार्वेकर [५]३ जुलै २०२२
६.उपसभापती महाराष्ट्र विधान परिषदनीलम गोऱ्हे-८ सप्टेंबर २०२०
७.उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभानरहरी सिताराम झिरवाळ-१४ मार्च २०२०
८.महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे नेतेएकनाथ शिंदे३ जुलै २०२२
९.महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहाचे नेतेदेवेंद्र फडणवीस-१७ ऑगस्ट २०२२
१०.महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे उपनेतेदेवेंद्र फडणवीस ३ जुलै २०२२
११.महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहाचे उपनेतेउदय सामंत (कार्यवाहू)-१७ ऑगस्ट २०२२
१२.विरोधी पक्षनेता विधानसभाअजित पवार[६]४ जुलै २०२२
१३.विरोधी पक्षनेता विधान परिषदअंबादास दानवे-९ ऑगस्ट २०२२
१४.मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशमा. सरन्यायाधीश दीपांकर दत्ता [७]-२८ एप्रिल २०२०
१५.महाराष्ट्राचे मुख्य सचिवमनुकुमार श्रीवास्तव[८][९]-२८ फेब्रुवारी २०२२
१६.पोलिस महासंचालक, महाराष्ट्र पोलीसरजनीश सेठ [१०]-१८ फेब्रुवारी २०२२
१७आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगउर्विंदर पाल सिंग मदान [११]-२६ मे २०२०
१८अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगकिशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर [१२]-२६ नोव्हेंबर २०२१
१९अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला आयोगरुपाली चाकणकर [१३]-२१ ऑक्टोबर २०२१


मंत्री मंडळ

मंत्री मंडळाला इंग्लिश मध्ये कॅबिनेट म्हणतात. ह्या मंत्रीमंडळात जो सहभागी असतो तो मंत्री होय. मंत्री मंडळातील मंत्री हा त्याला मिळालेल्या विभागाचा प्रमुख असतो आणि ह्या खात्यांशी संबंधित निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार त्याच्याकडे असतो. त्याच्या हाताखाली राज्यमंत्री, उपमंत्री असू शकतात. राज्यमंत्री मंत्री मंडळातील बैठकींमध्ये सहभाग नाही घेऊ शकत. स्वतंत्र प्रभार असणारा राज्य मंत्री हा एक प्रकारे कॅबिनेट मंत्र्यांसारखाच असतो, संबंधित खात्यांशी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो. पण हा देखील मंत्रीमंडळाच्या बैठकीत केवळ त्याच्या खात्याचा चर्चेपुरताच सहभाग घेऊ शकतो.[१४] मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्या सहित एकूण मंत्र्यांची संख्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशी तरतूद आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असते.[१४][१५]

महाराष्ट्रात १४ व्या विधानसभा निवडणुकीनंतर १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते. त्यानंतर देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पण बहुमत नसल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.[१६] दोन दिवसांनंतर, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेतील अंतर्गत बंडामुळे उद्धव ठाकरेंनी २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपच्या सहाय्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर भाजपचे देवेंद्र फडणविस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मंत्री

अनुक्रमनावमतदारसंघविभाग[१७]पक्षकार्यकाळ
पासूनकालावधी
१.एकनाथ संभाजी शिंदे , मुख्यमंत्रीकोपरी-पाचपाखाडीसामान्य प्राशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषयशिवसेना(शिंदे गट)३० जून २०२२(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
२.देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्रीनैर्ऋत्य नागपूरगृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचारभाजप३० जून २०२२(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
३.राधाकृष्ण विखे-पाटीलशिर्डीमहसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासभाजप-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
४.सुधीर मुनगंटीवारबल्लारपूरवने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसायभाजप-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
५.रविंद्र चव्हाणडोंबिवलीसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणभाजप-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
६.चंद्रकांत पाटीलकोथरुडउच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यभाजप-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
७.विजयकुमार गावितनंदुरबारआदिवासी विकासभाजप-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
८.गिरीष महाजनजामनेरग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणभाजप-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
९.गुलाबराव पाटीलजळगाव ग्रामिणपाणीपुरवठा व स्वच्छताशिवसेना(शिंदे गट)-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
१०.दादा भुसेमालेगाव बाह्यबंदरे व खनिकर्मशिवसेना(शिंदे गट)-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
११.संजय राठोडडिग्रसअन्न व औषध प्रशासनशिवसेना(शिंदे गट)-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
१२.संदीपान भुमरेपैठणरोजगार हमी योजना व फलोत्पादनशिवसेना(शिंदे गट)-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
१३.उदय सामंतरत्‍नागिरीउद्योगशिवसेना(शिंदे गट)-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
१४.तानाजी सावंतपरंडासार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणशिवसेना(शिंदे गट)-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
१५.अब्दुल सत्तारसिल्लोडकृषीशिवसेना(शिंदे गट)-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
१६.दीपक केसरकरसावंतवाडीशालेय शिक्षण व मराठी भाषाशिवसेना(शिंदे गट)-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
१७.अतुल सावेछत्रपती संभाजीनगर पूर्वसहकार, इतर मागास व बहुजन कल्याणभाजप-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
१८.शंभूराज देसाईपाटणराज्य उत्पादन शुल्कशिवसेना(शिंदे गट)-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
१९.मंगलप्रभात लोढामलबार हिलपर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकासभाजप-(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)

राज्यमंत्री

अनुक्रमनावमतदारसंघविभागपक्षकार्यकाळ
पासूनकालावधी
१.राधाकृष्ण-विखे पाटीलशिर्डीमहसूल , पशुसंवर्धन व दुग्धविकास--(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
२.रिक्त-गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्ये, माजी सैनिक कल्याण--(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
३.रिक्त-गृह (ग्रामीण) , वित्त , नियोजन , राज्य उत्पादन शुल्क , कौशल्य विकास व उद्योजकता , पणन--(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
४.रिक्त-जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग , विमुक्त जाती , भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार--(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
५.रिक्त-सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन--(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
६.रिक्त-सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा--(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
७.रिक्त-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य--(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
८.रिक्त-पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्ये--(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
९.रिक्त-नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन--(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)
१०.रिक्त-उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क--(&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस)

सर्व विभाग

पालकमंत्री

पालकमंत्री हे मुख्यमंत्री यांच्या कडून प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त केले जातात. जिल्हा प्रशासन व राज्य सरकार मधील एक महत्वाचा दुवा म्हणून ते काम करतात. सध्याच्या महाराष्ट्राच्या वर्तमान पालकमंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

शिंदे - फडणवीस सरकार मधील पालकमंत्र्यांची यादी-[१८]

अनुक्रमजिल्हापालकमंत्रीपक्षपासून
०१अहमदनगरराधाकृष्ण विखे पाटीलभाजप२४ सप्टेंबर २०२२
०२अकोलादेवेंद्र फडणवीसभाजप२४ सप्टेंबर २०२२
०३अमरावतीदेवेंद्र फडणवीसभाजप२४ सप्टेंबर २०२२
०४औरंगाबादसंदिपान भुमरेशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
०५बीडअतुल सावेभाजप२४ सप्टेंबर २०२२
०६भंडारादेवेंद्र फडणवीसभाजप२४ सप्टेंबर २०२२
०७बुलढाणागुलाबराव पाटीलशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
०८चंद्रपूरसुधीर मुनगंटीवारभाजप२४ सप्टेंबर २०२२
०९धुळेगिरीश महाजनभाजप२४ सप्टेंबर २०२२
१०गडचिरोलीदेवेंद्र फडणवीसभाजप२४ सप्टेंबर २०२२
११गोंदियासुधीर मुनगंटीवारभाजप२४ सप्टेंबर २०२२
१२हिंगोलीअब्दुल सत्तारशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
१३जळगावगुलाबराव पाटीलशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
१४जालनाअतुल सावेभाजप२४ सप्टेंबर २०२२
१५कोल्हापूरदीपक केसरकरशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
१६लातूरगिरीश महाजनभाजप२४ सप्टेंबर २०२२
१७मुंबई शहरदीपक केसरकरशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
१८मुंबई उपनगरमंगलप्रभात लोढाभाजप२४ सप्टेंबर २०२२
१९नागपूरदेवेंद्र फडणवीसभाजप२४ सप्टेंबर २०२२
२०नांदेडगिरीश महाजनभाजप२४ सप्टेंबर २०२२
२१नंदुरबारविजयकुमार गावितभाजप२४ सप्टेंबर २०२२
२२नाशिकदादा भुसेशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
२३उस्मानाबादतानाजी सावंतशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
२४पालघररवींद्र चव्हाणभाजप२४ सप्टेंबर २०२२
२५परभणीतानाजी सावंतशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
२६पुणेचंद्रकांत पाटीलभाजप२४ सप्टेंबर २०२२
२७रायगडउदय सामंतशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
२८रत्‍नागिरीउदय सामंतशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
२९सांगलीसुरेश खाडेभाजप२४ सप्टेंबर २०२२
३०साताराशंभूराज देसाईशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
३१सिंधुदुर्गरवींद्र चव्हाणभाजप२४ सप्टेंबर २०२२
३२सोलापूरराधाकृष्ण विखे पाटीलभाजप२४ सप्टेंबर २०२२
३३ठाणेशंभूराज देसाईशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
३४वर्धादेवेंद्र फडणवीसभाजप२४ सप्टेंबर २०२२
३५वाशिमसंजय राठोडशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२
३६यवतमाळसंजय राठोडशिवसेना(शिंदे गट)२४ सप्टेंबर २०२२

प्रमुख नेते

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ