रोखे बाजार

रोखे बाजार किंवा शेअर बाजार (इंग्लिश: Stock exchange, स्टॉक एक्सचेंज) ही समभाग, रोखे, बाँड इत्यादी वित्तीय घटकांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार घडवणारी आर्थिक संस्था आहे. येथे शेअर दलाल व व्यापारी रोख्यांची देवाण-घेवाण करतात. रोखे बाजार हा समभाग बाजार ह्या मोठ्या आर्थिक संस्थेचा एक घटक आहे. रोखे बाजारामधील व्यवहार स्थावर वास्तूमध्ये पार पाडले जातात.

रोखे बाजार म्हणजे सर्व सहभागी घटकांदरम्यान परस्परसंबंध असलेली अशी व्यवस्था असते. हिच्याद्वारे खालील गोष्टी सुकर होतात :

  • रोखे खरीदणे व विकणे
  • नवीन रोखे जारी करून नवे भांडवल उभारणे
  • स्थावर मालमत्तेचे वित्तीय मालमत्तेत रूपांतर करणे
  • फायदा मिळवण्याच्या हेतूने अल्प व दीर्घ मुदतींसाठी पैसा गुंतवणे.

रोखे बाजाराचे स्तर

जगातील प्रमुख रोखे बाजार

क्रमरोखे बाजारदेशमुख्यालयबाजार पुंजीकरण
($ अब्ज)
Year-to-date Trade Value
($ अब्ज)
प्रमाणवेळΔउन्हाळी वेळखुला
(स्थानिक)
बंद
(स्थानिक)
भोजन
(स्थानिक)
खुला
(यूटीसी)
बंद
(यूटीसी)
1न्यू यॉर्क रोखे बाजार  अमेरिकान्यू यॉर्क शहर14,08512,693पूर्व प्रमाणवेळ/पूर्व उन्हाळी वेळ−5मार्च-नोव्हेंबर09:3016:00नाही14:3021:00
2नॅसडॅक  अमेरिकान्यू यॉर्क शहर4,5828,914पूर्व प्रमाणवेळ/पूर्व उन्हाळी वेळ−5मार्च-नोव्हेंबर09:3016:00नाही14:3021:00
3टोकियो रोखे बाजार  जपानटोकियो3,4782,866जपान प्रमाणवेळ+909:0015:0011:30–12:3000:0006:00
4लंडन रोखे बाजार  युनायटेड किंग्डमलंडन3,3961,890ग्रीनविच प्रमाणवेळ/ब्रिटिश उन्हाळी वेळ+0मार्च-ऑक्टो08:0016:30नाही08:0016:30
5युरोनेक्स्ट  फ्रान्स  नेदरलँड्स  बेल्जियम  पोर्तुगालॲम्स्टरडॅम2,9301,900मध्य युरोपीय प्रमाणवेळ/मध्य युरोपीय उन्हाळी वेळ+1मार्च-ऑक्टो09:0017:30नाही08:0016:30
6हाँग काँग रोखे बाजार  हाँग काँगहाँग काँग2,831913हाँग काँग वेळ+809:1516:0012:00–13:0001:1508:00
7शांघाय रोखे बाजार  चीनशांघाय2,5472,176चिनी प्रमाणवेळ+809:3015:0011:30–13:0001:3007:00
8टोराँटो रोखे बाजार  कॅनडाटोराँटो2,0581,121पूर्व प्रमाणवेळ/पूर्व उन्हाळी वेळ−5मार्च-नोव्हे09:3016:00नाही14:3021:00
9फ्रांकफुर्ट रोखे बाजार  जर्मनीफ्रांकफुर्ट1,4861,101मध्य युरोपीय प्रमाणवेळ/मध्य युरोपीय उन्हाळी वेळ+1मार्च-ऑक्टो08:0022:00नाही07:0021:00
10ऑस्ट्रेलियन समभाग बाजार  ऑस्ट्रेलियासिडनी1,386800ऑस्ट्रेलियन पूर्व प्रमाणवेळ/ऑस्ट्रेलियन पूर्व उन्हाळी वेळ+10ऑक्टो-एप्रिल09:5016:12नाही23:5006:12
11मुंबई रोखे बाजार  भारतमुंबई1,26393भारतीय प्रमाणवेळ+5.509:1515:30नाही03:4510:00
12राष्ट्रीय रोखे बाजार  भारतमुंबई1,234442भारतीय प्रमाणवेळ+5.509:1515:30नाही03:4510:00
13एस.आय.एक्स. स्विस बाजार  स्वित्झर्लंडझ्युरिक1,233502मध्य युरोपीय प्रमाणवेळ/मध्य युरोपीय उन्हाळी वेळ+1मार्च-ऑक्टो09:0017:30नाही08:0016:30
14बी.एम.&एफ. बोव्हेस्पा  ब्राझीलसाओ पाउलो1,227751ब्राझील प्रमाणवेळ/ब्राझील उन्हाळी वेळ−3ऑक्टो-फेब्रु10:0017:30नाही13:0020:00
15कोरिया बाजार  दक्षिण कोरियासोल1,1791,297कोरिया प्रमाणवेळ+909:0015:00नाही00:0006:00
16षेंचेन रोखे बाजार  चीनषेंचेन1,1502,007चिनी प्रमाणवेळ+809:3015:0011:30–13:0001:3007:00
17बी.एम.ई. स्पॅनिश बाजार  स्पेनमाद्रिद995731मध्य युरोपीय प्रमाणवेळ/मध्य युरोपीय उन्हाळी वेळ+1मार्च-ऑक्टो09:0017:30नाही08:0016:30
18जे.एस.ई. लिमिटेड  दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्ग903287मध्य आफ्रिका प्रमाणवेळ+209:0017:00नाही07:0015:00
19मॉस्को बाजार  रशियामॉस्को825300मॉस्को प्रमाणवेळ+410:0018:45नाही06:0014:45
20सिंगापूर बाजार  सिंगापूरसिंगापूर765215सिंगापूर प्रमाणवेळ+809:0017:00नाही01:0009:00
21तैवान रोखे बाजार  तैवानतैपै735572चिनी प्रमाणवेळ+809:0013:30नाही01:0005:30

शेअर मार्केटसंबंधी पुस्तके

  • गलगली सूत्रे - शेअर बाजारातील युक्त्या (गोपाल गलगली)
  • गुंतवणूक गाथा (गोपाल गलगली)
  • तरुण वृद्धांनो मुद्दल खर्च करायला लागा (गोपाल गलगली)
  • दाम दसपट (गोपाल गलगली)
  • भारतातील शेअर बाजाराची ओळख (जितेंद्र गाला)
  • व्हा शेअर बाजार तज्ज्ञ (गौरव मुठे)
  • शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव! (रवींद्र देसाई)
  • शेअर बाजार एक अनोखे कारकीर्द (अनुवादित, शुभांगी वाड-देशपांडे, मूळ लेखिका - सुरेखा मश्रूवाला)
  • शेअर बाजाराची यथार्थ ओळख (कृ.भा. परांजपे)
  • शेअर मार्केट (गोपाल गलगली)
  • शेअर मार्केट अभ्यास आणि अनुभव (उदय कुलकर्णी)
  • शेअर मार्केटची तोंडओळख (डाॅ. ह.ना. कुंदेन)
  • शेअर मार्केटची सूत्रे (अरुण वामन पितळे)
  • शेअर मार्केटच्या ट्रेडिंग ट्रिक्स (सुनील हरदास)
  • शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा (रवींद्र पटील)
  • शेअर मार्केट रेडी रेकनर आणि बॅलन्सशीट कसा वाचावा? (गोपाल गलगली)

संदर्भ