२००९ लोकसभा निवडणुका

भारतातील सार्वत्रिक निवडणूक

भारताच्या १५ व्या लोकसभेसाठीच्या निवडणुका एप्रिल १६, एप्रिल २२, एप्रिल २३, एप्रिल ३०, मे ७ आणि मे १३ अशा ५ टप्प्यात होणार आहेत. मतमोजणी मे १६ इ.स. २००९ रोजी करण्यात येणार आहे.[१] या निवडणुकांत अंदाजे ७१ कोटी ४ लाख मतदार आपला कौल देतील. मागील निवडणुकांपेक्षा ही संख्या ४ कोटी ३० लाखांनी जास्त आहे. या निवडणुकीसाठी २००९ च्या अंदाजपत्रकात ११ अब्ज २० कोटी रुपयांची (१ कोटी ८० लाख युरो) तरतूद करण्यात आलेली आहे.[२] या निवडणुकी बरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीममध्ये त्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकाही घेण्यात येतील.

२००९ भारतीय सार्वत्रिक (लोकसभा) निवडणूक
भारत

लोकसभेच्या ५४५ पैकी ५४३ जागा
बहुमतासाठी २७२ जागांवर विजय आवश्यक
 पहिला पक्षदुसरा पक्ष
 
नेतामनमोहन सिंगलालकृष्ण आडवाणी
पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय जनता पक्ष
मागील जागा१४५१३८
जागांवर विजय२०६११६
बदल६१२२

निवडणुकीपूर्वी पंतप्रधान

मनमोहन सिंग

निर्वाचित पंतप्रधान

मनमोहन सिंग

before_party       = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस map =

भारतीय संविधानानुसार पाचवर्षात एकदा लोकसभा निवडणुका घेणे आवश्यक आहे. १४व्या लोकसभेची मुदत जून १, २००९ रोजी संपेल. १५वी लोकसभा त्याआधी अस्तित्वात येईल. या निवडणुका भारतीय निवडणुक आयोग घेते.

निकाल आढावा

२००९ एप्रिल/मे मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा
संदर्भ: निवडणुक आयोग Archived 2009-05-16 at the Wayback Machine. आयबीएन लाइव Archived 2009-05-19 at the Wayback Machine.

आघाडीपक्षजिंकलेल्या जागाबदल
यु.पी.ए.
जागा: 263
बदल: +८०
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२०६+६१
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस१९+१७
द्रविड मुनेत्र कळघम१८+२
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
नॅशनल कॉन्फरन्स पक्ष+२
झारखंड मुक्ती मोर्चा−३
भारतीय संयुक्त मुस्लिम लीग+१
केरळ काँग्रेस (मणी)+१
ऑल इंडिया मजलिस-इ-इत्तेहादुल मुस्लीमीन
विदुथलै चिरुतैगल कच्ची--
आर.पी.आय. (आठवले)−१
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
Seats: १५९
जागा बदल: −१७
भारतीय जनता पक्ष११६−२२
जनता दल (संयुक्त)२०+१२
शिवसेना११−१
राष्ट्रीय लोक दल+२
शिरोमणी अकाली दल−४
तेलंगण राष्ट्र समिती−३
आसाम गण परिषद−१
भारतीय राष्ट्रीय लोक दल
तिसरी आघाडी
जागा: ७८
बदल: −२७
डावी आघाडी२४−२९
बहुजन समाज पक्ष२१+२
बिजु जनता दल१४+३
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम+९
तेलुगू देसम पक्ष+१
जनता दल (धर्मनिरपेक्ष)−१
हरियाणा जनहित काँग्रेस+१
पट्टली मक्कल कच्ची−६
चौथी आघाडी
जागा: २६
बदल: -३७
समाजवादी पक्ष२३−१३
राष्ट्रीय जनता दल−२०
लोक जनशक्ती पक्ष−४
इतर व अपक्ष
जागा: १७
१७
  • नोंद: आघाडीच्या खासदारंच्या संख्येतील बदल हा आघाडीतील सगळ्या पक्षांच्या संख्येतील एकूण बदल आहे.

निवडणुक कार्यक्रम

मार्च २ २००९ रोजी भारतीय निवडणुक मुख्यायुक्त एन. गोपालास्वामीने खालील कार्यक्रम जाहीर केला:

टप्प्यांनुसार विस्तारित कार्यक्रम

२००९ लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम
घटनाटप्पे
पहिला टप्पादुसरा टप्पातिसरा टप्पाचौथा टप्पापाचवा टप्पा
टप्पा २अटप्पा २बटप्पा ३अटप्पा ३बटप्पा ३कटप्पा ५अटप्पा ५ब
कार्यक्रम जाहीरसोम,मार्च
कार्यक्रमाची अधिकृत जाहीरातसोम, मार्च २३शनि, मार्च २८गुरू, एप्रिल २शनि, एप्रिल ११शुक्र, एप्रिल १७
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवससोम, मार्च ३०शनि, एप्रिल ४गुरू, एप्रिल ९शनि, एप्रिल १८शुक्र, एप्रिल २४
उमेदवारी अर्जांची तपासणीमंगळ, मार्च ३१सोम, एप्रिल ६शनि, एप्रिल ११शुक्र, एप्रिल १०सोम, एप्रिल २०शनि, एप्रिल २५
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवसगुरू, एप्रिल २बुध, एप्रिल ८सोम, एप्रिल १३बुध, एप्रिल १५सोम, एप्रिल १३बुध, एप्रिल २२सोम, एप्रिल २७मंगळ, एप्रिल २८
निवडणुकगुरू, एप्रिल १६बुध, एप्रिल २२गुरू, एप्रिल २३गुरू, एप्रिल ३०गुरू, मे ७बुध, मे १३
मतमोजणीशनि, मे १६
निवडणुक प्रकियेचा शेवटचा दिवसगुरू, मे २८
राज्ये व केंद्रशासित प्रदेश१७१२
लोकसभा मतदारसंघ१२४१४०७७२९८५७२१४
Source:[१]

निवडणुक वेळापत्रक

लोकसभा निवडणुक २००९ चरण
चरणराज्य व केंद्रशासीत प्रदेश संख्यासंसदीय क्षेत्र संख्यानिवडणुक तारीख
१७
(आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, जम्मू आणि काश्मीर, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, अंदमान आणि निकोबारलक्षद्वीप.)
१२४एप्रिल १६, २००९, (गुरुवार)
१३
(आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, झारखंड)
१४१एप्रिल २३, २००९, (गुरुवार)
(एप्रिल २२, २००९, बुधवार फक्त १- अंतः मणिपूर मतदारसंघ)
११
(बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, गुजरात, सिक्किम, दादरा आणि नगर-हवेलीदमण आणि दीव)
१०७एप्रिल ३०, २००९, (गुरुवार)

(बिहार, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालदिल्ली)
८५मे ७, २००९, (गुरुवार)

(हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, चंदिगढ, पुडुचेरीउत्तर प्रदेश)
८६मे १३, २००९, (बुधवार)
पंधरावी लोकसभा निवडणुक आराखडा
राज्य व केंद्रशासीत प्रदेश चरण संख्या
चरण संख्याराज्य व केंद्रशासीत प्रदेश
पाचजम्मू आणि काश्मीरउत्तर प्रदेश
तीनमहाराष्ट्रपश्चिम बंगाल
दोनआंध्र प्रदेश, आसाम, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशापंजाब
एकउर्वरीत १५ राज्ये व ७ केंद्रशासीत प्रदेश

[३][४]

प्रमुख उमेदवार

पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार

भारतीय लोकशाहीत पंतप्रधानपदासाठी थेट निवडणुक नसते तर निवडलेले संसदसदस्य पंतप्रधान निवडतात. तरीही प्रमुख पक्षांनी जर त्यांना बहुमत मिळाले तर पंतप्रधानपदी कोण असेल याची जाहीतार केली आहे.

युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधीच्या वक्तव्यानुसार यु.पी.ए.कडून सद्य पंतप्रधान मनमोहनसिंग पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी उमेदवार असतील.[५] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता शरद पवारने आपणही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे विधान केले आहे.[६] यानंतर मनमोहनसिंग यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली[७] व त्यामुळे पुढील पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल नव्याने अटकळी सुरू झाल्या आहेत. याला खीळ घालण्यासाठी फेब्रुवारी ६, २००९ रोजी सोनिया गांधीने आपल्या लेखात मनमोहनसिंगच यु.पी.ए.चे पंतप्रधान उमेदवार असल्याचे प्रतिपादन केले.[८]

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

संसदेतील मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षाने डिसेंबर ११, २००७ रोजी जाहीर केले की लालकृष्ण अडवाणी त्यांचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार असतील.[९] जानेवारी २३, २००८ रोजी अडवाणींना अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली.[१०]. रा.लो.आ.मधील इतर पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

तिसरी आघाडी

कम्युनिस्ट पक्ष व इतर प्रादेशिक राजकीय पक्षांनी वरील दोन आघाड्यांना पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची स्थापना केली आहे. तथापि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केले आहे की जर त्या पक्षाला पुरेश्या जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षाशी जुळवून घेउन सरकार स्थापण्यासाठीच्या वाटाघाटी करण्यास त्यांची तयारी आहे.साचा:Fact. मायावती या आघाडीच्या अधिकृत उमेदवार असण्याचीही शक्यता आहे. मायावतीने पंतप्रधानपद मिळवण्यासाठी कोणाशीही संधान बांधण्याची तयारी दाखवली आहे.[११] इतर कोणीही आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही.

जनमत चाचण्या

या चाचण्या निवडणुक आयोगाशी संलग्न नसतात.

संस्थातारखानिकाल
स्टार-नील्सन५-३ - १७-३-२००९युपीए २५७ (काँग्रेस १४४), एनडीए १८४ (भाजप १३७), इतर ९६[१२]
टाइम्स ऑफ इंडियामार्च २००९युपीए २०१ (काँग्रेस १४६), एनडीए १९५ (भाजप १३८), इतर १४७[१३]
सीएनएन-आयबीएन-सीएसडीएस८-१ - १५-१-२००९युपीए २१५-२३५, एनडीए १६५-१८५, इतर १२५-१५५[१४]

संदर्भ व नोंदी