२०१९–२० हाँग काँग निषेध


२०१९ च्या हाँगकाँग गुन्हेगार हस्तांतर बीलचा विरोध म्हणजे हाँगकाँग आणि जगभरातील इतर शहरांमधील सामुहिक विरोधी सभांची मालिका आहे. यात हाँगकाँग सरकारकडून प्रस्तावित गुन्हेगारी कायदे (दुरुस्तीचे) विधेयक (२०१९) मधील अपराधी आणि म्युच्युअल लीगल सहाय्य मागे घेण्याची मागणी केली होती. या मागे भय हे आहे की या बिलामुळे मुख्य चीनी कायदा त्याचे लांबलचक हात हाँगकाँग पर्यंत पोहचतील आणि हाँगकाँगमधील लोक त्याला बळी पडतील. तसेच एखाद्या वेगळ्या कायदेशीर व्यवस्थेच्या कक्षेत हाँगकाँगमधील लोक येऊ शकतील.

२०१९–२० हाँग काँग निषेध
९ जून रोजी हेनेसी रोडवर केलेल्या निषेधाचे चित्र.
अटक
Arrested३५८[१]

हाँगकाँगमध्ये सामान्य लोक आणि कायदेशीर समुदायांद्वारे विविध पातळीवर निषेध सुरू आहेत. यापैकी 9 जून रोजी सिव्हिल ह्यूमन राइट्स फ्रंटने आयोजित केलेल निषेध आहे, संस्थेच्या अंदाजानुसार १०,३०,००० लोक उपस्थित होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात मास मीडिया कव्हरेज मिळविले आहे [२]. अनेक ठिकाणी विदेशात हाँगकाँगच्या लोकांनी विरोध केला.

संदर्भ