ॲडेल

अ‍ॅडेल लॉरी ब्लू अ‍ॅडकिन्स [१] (जन्म: ५ मे, १९८८), ही अ‍ॅडेल या एकेरी नावाने सुप्रसिद्ध असलेली, इंग्रजी गायिका आणि कवयित्री आहे. एका मित्राने २००६ मध्ये मायस्पेसवर तिची गाणी टाकल्यानंतर अ‍ॅडेलला एक्स्एल रेकॉर्डिंग्जतर्फे गाणी ध्वनिमुद्रित करण्याचे कंत्राट मिळाले. त्याच्या पुढच्याच वर्षी तिला ब्रिट अवॉर्ड्‌जमधील समीक्षकांचा पुरस्कार आणि बीबीसी(साउंड ऑफ २००८) हा पुरस्कार मिळाला. तिचा पहिला अल्बम 19 २००८ मध्ये बाहेर पडला, त्याला मोठे यश मिळाले. त्या अल्बमला यू.के.मध्ये ४ पट प्लॅटिनम विक्रीचा दाखला मिळाला[२]. तिने सॅटरडे नाइट लाइव्ह या कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर तिच्या अमेरिकेतील कारकीर्दीला २००८च्या उत्तरार्धात जोर मिळाला. अ‍ॅडेलने तिचा दुसरा अल्बम 21 २०११ मध्ये बाजारात आणला. त्याला दोन्ही समीक्षकांकडून आणि शिवाय बाजारात चांगल्या रितीने स्वीकारले गेले, आणि या आल्बममध्ये तिला तिच्या पहिल्या अल्बमपेक्षाही जास्त यश मिळाले. 21 या अल्बमला यू.के.मध्ये १४ पट प्लॅटिनम विक्री झाल्याचा दाखला मिळाला.[२], हा आल्बम अमेरिकेत १९९८ नंतरच्या इतर कोणत्याही अल्बमपेक्षा जास्त दिवस पहिल्या स्थानावर राहिला होता.[३][४]

अ‍ॅडेल

ॲडेल
आयुष्य
जन्ममे ५, १९८८
जन्म स्थानटॉटनहॅम, उत्तर लंडन , इंग्लंड, यू.के.
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्वब्रिटिश
देशइंग्लंड
भाषाइंग्रजी
संगीत साधना
गायन प्रकारपॉप, ब्लूज
संगीत कारकीर्द
कार्य19 , 21
पेशागायकी
कारकिर्दीचा काळइ..स. २००६ - आजपर्यंत
गौरव
पुरस्कारग्रॅमी पुरस्कार
बाह्य दुवे
संकेतस्थळ

21 या अल्बमच्या यशामुळे अ‍ॅडेलची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌जमध्ये विविध विक्रमांसाठी नोंद करण्यात आली. ती यू.के.मध्ये एका वर्षात अल्बमच्या३० लाखांपेक्षा जास्त प्रती विकणारी पहिली कलाकार बनली[५]. १९६४ मधील बीटल्सनंतर पहिल्यांदाच कुणीतरी एकाचवेळी यू.के. ऑफिशियल सिंगल्स चार्ट आणि ऑफिशियल अल्बम चार्ट यांमध्ये पहिल्या पाच स्थानांतील दोन जागा पटकवण्याची कामगिरी केली आहे. अ‍ॅडेलला २०११ मध्ये दोन आणि २०१२ मध्ये सहा ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत[६][७][८].

संदर्भ

बाह्यदुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत