लुफ्तान्सा

दॉइशे लुफ्तान्सा आ.गे. अथवा लुफ्तान्सा (जर्मन: Deutsche Lufthansa AG)) ही य्रुरोपातील तसेच जगातील अग्रणीची नागरी विमान वाहतूक कंपनी असून मूळ जर्मन कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय क्योल्न येथे असून याचा मुख्य विमानतळ फ्रांकफुर्ट येथे आहे. लुफ्तांसा प्रवासीउड्डाणांनुसार जगातील पाचव्या क्रमांकाची तर युरोपमधील दुसऱ्या विमानकंपनी आहे. याची विमान सेवा जर्मनीतील १८ व जगभरातील ७८ देशातून शहरांत असून जर्मनीतून जगभरातील १८०हून अधिक ठिकाणी त्यांची उड्डाणे होतात. आपल्या सहकंपन्यांसह लुफ्तांसा ४१० ठिकाणी प्रवासी पोचवते व आणते.[१] लुफ्तांसाकडे ७२२ विमाने आहेत.[२]

लुफ्तान्सा
आय.ए.टी.ए.
LH
आय.सी.ए.ओ.
DLH
कॉलसाईन
लुफ्तान्सा
स्थापना१९२६, १९५४मध्ये पुनर्स्थापना
हबफ्रांकफुर्ट विमानतळ
म्युनिक विमानतळ
मुख्य शहरेबर्लिन, हांबुर्ग, मिलान, श्टुटगार्ट
फ्रिक्वेंट फ्लायरमाइल्स अँड मोअर
अलायन्सस्टार अलायन्स
उपकंपन्या
विमान संख्या६६७
गंतव्यस्थाने२१५
ब्रीदवाक्यNonstop you
मुख्यालयक्योल्न
प्रमुख व्यक्तीकार्श्टेन स्फोर
संकेतस्थळhttp://www.lufthansa.com

लुफ्तांसाचे प्रशासकीय मुख्यालय ड्यूट्झ या क्योल्नचा उपनगरात आहे तर मुख्य हब फ्रांकफुर्ट आणि दुय्यम हब म्युन्शेन येथे आहे.[१][३][४][५] लुफ्तांसाचे बहुतांश वैमानिक व कर्मचारी फ्रांकफुर्टस्थित आहेत.[६] लुफ्तांसाकडे १,१७,००० कर्मचारी असून या कंपनीने २०१० साली ९ कोटी प्रवाशांची ने-आण केली (यात ब्रसेल्स एरलाइन्स आणि जर्मनविंग्सच्या प्रवाशांची गणती नाही).

फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे लुफ्तांसाचे एरबस ए३४०-६००

लुफ्तांसा स्टार अलायन्सचा संस्थापक सदस्य आहे. जेटब्ल्यू, ब्रसेल्स एरलाइन्स इत्यादी विमानकंपन्यांमध्ये लुफ्तान्साची भागीदारी आहे.

विमानांचा ताफा

एरबस ३२०-२००
ए३१९-१००चा छोटा उपप्रकार
ए३२१-१००चा अधिक मोठा उपप्रकार. या चित्रातील विमान लुफ्तांसाच्या १९५०च्या दशकातील रंगसंगतीत रंगवलेले आहे.

मार्च २०१५ च्या सुमारास लुफ्तांसाकडे खालील प्रकारची विमाने होती:[७][८][९][१०][११]

मुख्य ताफा (मेनलाइन)
प्रकारसेवेतमागणीऑप्शनप्रवासीनोंदी
FBEYएकूण
एरबस ए३१९-१००३०१३८१३८
एरबस ए३२०-२००५५३०75[A]१६८१६८
एरबस ए३२०निओ६०अज्ञात
एरबस ए३२१-१००२०२००२००
एरबस ए३२१-२००
एरबस ए३२१निओ४०अज्ञात
एरबस ए३३०-३००१९
४८१६१२१७
१६५२२१
एरबस ए३४०-३००१७४८१६५२२१यातील ८ विमाने लुफ्तांसा सिटीलाइनला देउन परत भाड्यावर घेण्यात येतील. ही विमाने सहलीच्या मार्गांवर जास्त प्रवासी बसतील अशा संरचनेत वापरण्यात येतील.[१२]
३६१९७२४१
४४२२२२६६
एरबस ए३४०-६००२४
६०२३८३०६
५६२२९२९३
एरबस ए३५०-९००२५[१३]१५[१३]अज्ञात२०१६-२०२३ दरम्यान सेवादाखल[१४]
एरबस ए३८०-८००१३९८४२०५२६२०१५मध्ये अजून एक सेवेत दाखल
९२५२३३६४८८
बोईंग ७३७-३००१४०१४०२०१५नंतर सेवानिवृत्त[१५]
बोईंग ७३७-५००१३१२०१२०२०१५नंतर सेवानिवृत्त[१५]
बोईंग ७४७-४००१६
८०२४२३३०
६६२७८३५२
६७३२२३८९
बोईंग ७४७-८आय१८
९२२६२३६२२०१५मध्ये अजून एक सेवादाखल[१६]
D-ABYI या विमानाला फॅनहंसा सीगरफ्लीगर रंगसंगती दिलेली आहे
D-ABYP हे १,५००वे ७४७ विमान आहे
D-ABYT या विमानाला १९७०मधील रंगसंगती दिलेली आहे.
८०२९८३८६
३२२४४३६४
बोईंग ७७७-९एक्स३४[१७]TBA२०२०-२०२५ दरम्यान सेवादाखल[१७]
एकूण२७८१९२९७

यातील किती ऑप्शन ए३२०-२०० आणि किती ए३२०निओ प्रकाराची आहेत याची गणती दिलेली नाही.[११]

ताफ्याचा इतिहास

लुफ्तांसाचे बोईंग ७३७-२०० पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळावर १९८३मध्ये उतरताना. शेपटीवरील चित्र उलट रंगसंगतीत आहे तर विमानाला रंग दिलेला नाही
बोईंग ७४७-२०० प्रकारचे विमान १९८९मध्ये फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरताना. ही रंगसंगती यानंतर लगेचच निवृत्त करण्यात आली व सध्याची रंगसंगती वापरण्यास सुरुवात झाली
बोईंग ७६७-३०० स्टार अलायन्सच्या रंगसंगतीत २००३ मध्ये फ्रांकफुर्ट विमानतळावर उभे असताना

लुफ्तांसाने आपल्या इतिहासात खालील प्रकारची विमाने वापरली आहेत:[१८]

Lufthansa Mainline Historical Fleet since 1955
प्रकारसेवेत रुजूनिवृत्तनोंदी
एरबस ए३००१९७६१९८४
एरबस ए३००-६००१९८७२००९
एरबस ए३१०१९८४२००५
एरबस ए३१९१९९६
एरबस ए३३०१९८९
एरबस ए३२११९९४
एरबस ए३३०-२००२००२२००६
एरबस ए३३०-३००२००४
एरबस ए३४०-२००१९९३२००६
एरबस ए३४०-३००१९९३
एरबस ए३४०-६००२००३
एरबस ए३८०२०१०
बोईंग ७०७१९६०१९८४मालवाहू आणि प्रवासी
बोईंग ७२०१९६११९६५
बोईंग ७२७-१००१९६४१९७९आतील रचना पटकन बदलता येणारा उपप्रकारही वापरात
बोईंग ७२७-२००१९७११९९३
बोईंग ७३७-१००१९६७१९८२सिटी जेट नावाने या प्रकाराचा पहिला वापरकर्ता
बोईंग ७३७-२००१९६९१९९७आतील रचना पटकन बदलता येणारा उपप्रकारही वापरात
बोईंग ७३७-३००१९८६आतील रचना पटकन बदलता येणारा उपप्रकारही वापरात
बोईंग ७३७-४००१९९२१९९८
बोईंग ७३७-५००१९९०
बोईंग ७४७-१००१९७०१९७९
बोईंग ७४७-२००१९७१२००४प्रवासी आणि मालवाहू
बोईंग ७४७-४००१९८९
बोईंग ७४७-८आय२०१२सर्वप्रथम वापरकर्ता
बोईंग ७६७-३००1994
२००३
1996
२००४
काँडोर फ्लुडीएन्स्टकडून भाडेतत्त्वावर[१९]
कॉन्व्हेर सीव्ही-२४०/३४०/४४०१९५५१९६८
कर्टीस सी-४६ कमांडो१९६४१९६९भाडेतत्त्वावर घेतलेली मालवाहू विमाने
डग्लस डीसी-३१९५५१९६०प्रवासी आणि मालवाहू
डग्लस डीसी-४१९५८१९५९एकमात्र मालवाहू विमान
डग्लस डीसी-६१९६५१९६६एकमात्र मालवाहू विमान
मॅकडोनेल डग्लस डीसी-१०१९७४१९९४
फोकर एफ२७ फ्रेंडशिप~१९६५~१९६६Leased from Condor
लॉकहीड कॉन्स्टेलेशन१९५५१९६७प्रवासी आणि मालवाहू
व्हिकर्स व्हीसी.१ व्हायकिंग१९५६१९६१दोन मालवाहू विमाने
व्हिकर्स व्हायकाउंट१९५८१९७१

विमानांचे नामकरण करण्याची पद्धत

सप्टेंबर १९६०मधे लुफ्तांसाने आपल्या D-ABOC या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानाचे नामकरण बर्लिन असे केले. फ्रांकफुर्ट ते न्यू यॉर्क मार्गावर प्रवास करणाऱ्या या विमानाचे नाव तेव्हाच्या पश्चिम बर्लिनच्या महापौर विली ब्रँटने केले होते. यानंतर लुफ्तांसाने आपल्या ७०७ विमानांना हांबुर्ग, फ्रांकफुर्ट, म्युन्शेन आणि बॉन अशी नावे दिली. यानंतर कंपनीने आपल्या विमानांना जर्मनीमधील शहरे, गावे आणि राज्यांची नावे देण्याची प्रथा सुरू केली. विमानांचा आकार आणि शहराच्या आकारात साम्य ठेवून ही नावे दिली जातात. याशिवाय एका एरबस ए३४०-३००ला (D-AIFC) लुफ्तांसाने गँडर/हॅलिफॅक्स असे नाव दिले आहे. जर्मनीमध्ये नसलेल्या शहराचे नाव असलेले हे लुफ्तांसाच्या दोनपैक एक विमान आहे. ही दोन्ही शहरे कॅनडामध्ये असून युरोप ते उत्तर अमेरिकेच्या वाटेवर आहेत. सप्टेंबर ११, २००१ च्या हल्ल्यांनंतर उत्तर अमेरिकेतील सगळ्या विमानांना तात्काळ जमिनीवर उतरणे भाग पाडले गेले तेव्हा अनेक विमानांनी या दोन शहरांत आश्रय घेतला होता. त्यावेळी तेथील नागरिकांनी या विमानांतील प्रवाशांचा केलेल्या पाहुणचाराची दखल म्हणून हा सन्मान दिला गेला आहे. जर्मन शहराचे नाव नसलेले दुसरे विमान D-AIRA हे फिंकेनवेर्डर नावाचे एरबस ए३२१-१०० विमान आहे. या शहरात एरबसची ४०% नॅरोबॉडी[मराठी शब्द सुचवा] विमाने बनवली जातात.

लुफ्तांसाच्या ए३८० प्रकारच्या पहिल्या दोन विमानांना फ्रांकफुर्ट आम मेन आणि म्युन्शेन ही नावे दिली गेली तर इतर ए३८० विमानांना स्टार अलायन्सचे मुख्य तळ असलेल्या तोक्यो, बीजिंग, ब्रसेल्स आणि न्यू यॉर्कची नावे दिली गेली आहे.

ऐतिहासिक विमानांचे पुनरुत्थान

लुफ्तांसा टेक्निक या लुफ्तांसाच्या विमानांची देखभाग करणाऱ्या विभागाने १९३६ साली तयार केलेले युंकर्स जेयु ५२-३एम प्रकारच्या विमानाचे अवशेष व सुटे भाग गोळा करून त्यास पुन्हा प्रवास करण्यालायक बनवले आहे. हे विमान १९३० च्या दशकात बर्लिन ते रोम या मार्गावर कार्यरत होते. यानंतर लुफ्तांसा टेक्निकने लॉकहीड सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारची तीन विमाने लिलावात विकत घेतली व त्यांतील भाग वापरून एक पूर्ण विमान तयार करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. सुपर कॉन्स्टेलेशन तसेच एल१६४९ स्टारलायनर प्रकारची विमाने हांबुर्ग-माद्रिद-डकार-काराकास-सांतियागो मार्गावर प्रवास करीत असत. या व अशा कामांसाठी लुफ्तांसा टेक्निक निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि स्वयंसेवकांची भरती करते.[२०][२१]

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: