एरबस ए३८०

वाइड-बॉडी, डबल-डेक, चार इंजिन असलेले विमान, सध्या जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान आहे

एरबस ए३८० हे फ्रान्समधील एरबस ह्या कंपनीने विकसित व उत्पादित केलेले लांब पल्ल्याचे, जगातील सगळ्यात जास्त प्रवासीक्षमता असलेले दोनमजली विमान आहे. चार इंजिने असलेले हे विमान ५२५ ते ८५३ प्रवाशांना १५,७०० कि.मी. पर्यंत नेऊ शकते. म्हणजेच हे विमान डॅलस ते सिडनी दरम्यान विनाथांबा जाऊ शकते. एरबस ए३८० चे पहिले उड्डाण २७ एप्रिल २००५ रोजी पार पडले तर ह्या विमानाची पहिली प्रवासी सेवा सिंगापूर एरलाइन्स ह्या कंपनीने २५ ऑक्टोबर २००७ रोजी पुरवली.

एरबस ए३८०

ए३८० दुबईमध्ये उतरताना

प्रकारलांब पल्ल्याचे मोठ्या क्षमतेचे चार इंजिनांचे जेट विमान
उत्पादकएरबस
पहिले उड्डाणएप्रिल २७, २००५
समावेशऑक्टोबर २५, २००७ (सिंगापूर एरलाइन्स)
सद्यस्थितीप्रवासीवाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ताएमिरेट्स, सिंगापूर एरलाइन्स, एर फ्रान्स, क्वांटास, लुफ्तांसा
उत्पादन काळ२००४-सद्य
उत्पादित संख्या१४७ (नोव्हेंबर २०१४)
प्रति एककी किंमत४१ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलर

एरबसने प्रतिस्पर्धी विमान उत्पादक बोइंगचे लांब पल्ल्याच्या विमानांवरील वर्चस्व मोडून काढण्यासाठी जून १९९४ मध्ये ह्या विमानाची घोषणा केली. १९ डिसेंबर २००० रोजी एरबसच्या प्रशासनाने ८.८ अब्ज युरो इतक्या खर्चाचा एरबस ए३८० विमान विकासाचा आराखडा मंजूर केला. २३ जानेवारी २००२ रोजी ह्या विमानाच्या पहिल्या सुट्या भागाचे उत्पादन सुरू झाले. पहिले विमान बांधून पूर्ण होईपर्यंत ह्या पूर्ण परियोजनेचा एकूण खर्च ११ अब्ज युरोंवर पोचला होता. अतिविशाल आकाराच्या ह्या विमानाचे सुटे भाग फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डमस्पेन ह्या देशांमध्ये बनवले जातात व तुलूझमधील प्रमुख कारखान्यामध्ये एकत्र जोडले जातात. ह्या विमानामधील अत्यंत गुंतागुंतीच्या विद्युत जोडण्या करण्यासाठी ५३० किमी लांबीच्या तारा वापरल्या जातात. एरबसने महिन्याला ४ ए३८० विमाने पूर्ण करण्याची क्षमता बनवली आहे.

मागण्या व ग्राहक

नोव्हेंबर २०१४ मध्ये एरबसकडे ए३८० विमानाच्या एकूण ३१८ मागण्या (ऑर्डर्स) होत्या ज्यांपैकी १४७ विमाने ग्राहकांना हास्तांतरीत करण्यात आली आहेत.

ग्राहकवापरास सुरुवातपक्क्या मागण्यापर्यायी मागण्यासुपूर्तीबातमी
एर ऑस्ट्राल2
एर फ्रान्स200912210[१]
अमेडेओ201620[२]
एशियाना एरलाइन्स201462[३]
ब्रिटिश एरवेझ20131278[४]
चायना सदर्न एरलाइन्स201155[५]
एमिरेट्स200814055[६]
एतिहाद एरवेझ20141051[७]
अज्ञात ग्राहक10
किंग्डम होल्डिंग कंपनी1
कोरियन एर20111010[८]
लुफ्तान्सा20101412[९]
मलेशिया एरलाइन्स201266[१०]
क्वांटास200820412[११]
कतार एरवेझ20141032[१२]
सिंगापूर एरलाइन्स200724119[१३]
थाई एरवेझ201266[१४]
ट्रान्सएरो एरलाइन्स20154[१५]
व्हर्जिन अटलांटिक201866[१६][१७]
एकूण31828147

चित्रदालन

ए३८० विमानासाठी रोल्स-रॉईस कंपनीची ४ इंजिने वापरली जातात.
ए३८० विमानासाठी रोल्स-रॉईस कंपनीची ४ इंजिने वापरली जातात. 
पहिले पूर्ण झालेले ए३८०
पहिले पूर्ण झालेले ए३८० 
पहिल्या उड्डाणानंतर उतरणारे ए३८०
पहिल्या उड्डाणानंतर उतरणारे ए३८० 
ए३८० चे कॉकपिट
ए३८० चे कॉकपिट 
इकॉनॉमी क्लास
इकॉनॉमी क्लास 

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: