लोह युग

मानवी संस्कृतीच्या विकासातील एक कालखंड .पाषाण युगानंतर ताम्रयुग आणि कांस्य युग सुरू झाले.पुरातत्त्वशास्त्रानुसार लोह युग हा पृथ्वीवरील असा ऐतिहासिक काळ होता, की जेव्हा लोखंड वा पोलाद ह्या धातूंपासुन औजारे व आयुधे बनवली जात होती. आर्य लोकांना लोहाचा उपयोग माहिती होता. मात्र लोहयुग केंव्हा सुरू झाले, हे निश्चितच सांगता येत नाही.कारण पुराण वस्तू संशोधनावरून असे ध्यानात येते की भिन्न भिन्न देशातील मानवांना लोहाचा उपयोग एकाच वेळी माहित झाला नव्हता.[१]भारतामध्ये सापडलेल्या पुरातत्त्व स्थळांवरून आजच्या उत्तर प्रदेश भागात इ.स. पूर्व १८०० ते इ.स. पूर्व १२०० ह्या दरम्यान लोह युग अस्तित्वात होते.[२] उपनिषदांमध्येदेखील धातुशास्त्राचा उल्लेख केला गेला आहे.[३]

व्यावहारिक महत्त्व

श्री.एन.आर.बनर्जी यांच्या मते आर्य लोकांना भारतात येण्यापूर्वीच लोखंडाचा उपयोग माहीत होता आणि त्यांच्याकडूनच आर्यांना लोहविद्या प्राप्त झाली असे श्री. अ.ज. करंदीकर यांनी प्रतिपादले आहे.

सांस्कृतिक महत्त्व

लोहारांना वेदात कर्मार ही संज्ञा दिली आहे. मुंड लोकात लोहाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मुंड म्हणजे लोह असा अर्थ प्रचलित झाला असावा.या संस्कृतीच्या लोकांचा वंश कोणता याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र त्‍यांच्या काळ्या-तांबड्या खापरांची बनावट उत्कृष्ट असून त्यांचे आकारही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.त्यावरील नक्षीकाम सुंदर असून,त्यात स्वस्तिक हे प्रतीक अनेक जागी आढळते.या संस्कृतीचे वैशिष्ट्य हे की या संस्कृतीचे लोक मृतांना दगडी कुंडात अथवा मातीच्या शव पेटिकेत पुरून त्यावर मोठ्या मोठ्या दगडांची वर्तुळे अथवा दगडी सोटे उभारीत. अशा तऱ्हेची काही दफने आढळली आहेत..[१]

हेसुद्धा पहा

संदर्भ