२००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी

इ.स. २००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी हा रविवार, २६ डिसेंबर इ.स. २००४ रोजी ००:५८:५३ यूटीसी वाजता (०६:२८:५३ वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार) एक समुद्राखालील भूकंप होता. रिश्टर स्केलवर Mw 9.1–9.3 इतक्या रिस्टर स्केल इतका मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र इंडोनेशिया देशाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिमेकडे हिंदी महासागरामध्ये होते. भूकंपमापन यंत्रावर मोजला गेलेला आजवरचा हा जगामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा भूकंप आहे. ह्या भूकंपानंतर उसळलेल्या त्सुनामीमुळे इंडोनेशिया, श्री लंका, भारतथायलंडसह १४ देशांमधील २.३ लाख लोक मृत्युमुखी पडले. जगामधील सर्वात प्रलयंकारी नैसर्गिक संकटांमध्ये ह्या भूकंपाचा समावेश होतो.

भूकंपाचे केंद्र व त्सुनामीचा प्रसार
त्सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये १० मीटर उंचीच्या लाटा उसळल्या.

जीवितहानी व वित्तहानी

भूकंपाने निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटांमुळे आग्नेय आशिया, दक्षिण आशियापूर्व आफ्रिका प्रदेशांमधील १४ देशांमध्ये जीवितहानी तर १५ देशांमध्ये वित्तहानी झाली.

देशनक्की मृत्यूअंदाज1जखमीबेपत्तानिर्वासित
 इंडोनेशिया130,736167,799n/a37,063500,000+[१]
 श्रीलंका235,322[२]35,32221,411[२]n/a516,150[२]
 भारत12,40518,045n/a5,640647,599
 थायलंड5,39538,2128,457[३]2,8177,000
 सोमालिया78289[४]n/an/a5,000[५]
 म्यानमार61400–60045200[६]3,200
 मालदीव82108[७]n/a2615,000+
 मलेशिया68[८]75299[९]6n/a
 टांझानिया10[१०]13n/an/an/a
 सेशेल्स3[११]357[११]n/a200[१२]
 बांगलादेश22n/an/an/a
 दक्षिण आफ्रिका24[१३]2n/an/an/a
 यमनचे प्रजासत्ताक2[१४]2n/an/an/a
 केन्या112n/an/a
 मादागास्करn/an/an/an/a1,000+[१५]
एकूण~184,167~230,273~125,000~45,752~1.69 दशलक्ष

उदिष्टे


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: