ढगाळ बिबट्या

जंगली मांजरीच्या प्रजाती

ढगाळ बिबट्या (शास्त्रीय नाव: Neofelis nebulosa, निओफेलिस नेब्युलोसा ; इंग्लिश: Clouded Leopard, क्लाउडेड लेपर्ड) हा भारताच्या आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर राज्यातील तराईच्या जंगलात आढळणारा प्राणी आहे. याचा सर्वाधिक आढळ भूतानमध्ये आहे. ह्या प्राण्याला लामचित्ता असेही नाव आहे. 

ढगाळ बिबट्या

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश:कणाधारी
जात:सस्तन
वर्ग:मांसभक्षक
कुळ:मार्जार कुळ
उपकुळ:पॅन्थेरिने
जातकुळी:निओफेलिस
जीव:नि. नेब्युलोसा
शास्त्रीय नाव
निओफेलिस नेब्युलोसा
(ग्रिफिथ, १८२१)

निओफेलिस नेब्युलोसा
इतर नावे

फेलिस मॅक्रोसेलिस
फेलिस मार्मोटा

वर्णन

ढगाळ बिबट्या हा बिबट्या सदॄश दिसतो पण ठिपक्यांऐवजी त्याच्या अंगावर मोठे मोठे ब्लॉक असतात म्हणूनच याचे नाव ढगाळ बिबट्या असे पडले आहे. हा आकाराने खूपच लहान असतो व वजन जेमतेम २०-२२ किलोपर्यंत भरते. मांजरांमध्ये मार्जारकुळामध्ये सर्वात जाड शेपटी याची असते. हा मुख्यत्वे झाडावर राहणे पसंत करतो व क्वचितच जमिनीवर उतरतो. त्याच्या जाड शेपटीमुळे त्याला झाडावर तोल सांभाळणे सोपे जाते. तो पिल्लांना झाडाच्या ढोलीत वाढवतो[२].

मार्जार कुळातील मोठ्या मार्जारांमध्ये व ढगाळ बिबट्यांमध्ये कवटीची रचना व दात या दोन बाबतीत तफावत असते. ढगाळ बिबट्याचे वरचे सुळे इतर मार्जारांपेक्षा जास्त विकसित असतात.

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे