लॅटिन लिपी

लॅटिन लिपी (किंवा रोमन लिपी) ही जगातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी लिपी आहे. हिची रचना कुमाएन लिपी या ग्रीक लिपीतून झाली. प्राचीन रोमन लोकांनी ही लिपी लॅटिन भाषा लिहिण्यासाठी वापरली.

मूळ लॅटिन वर्णाक्षरे
AaBbCcDd  
EeFfGgHh
IiJjKkLlMmNn
OoPpQqRrSsTt
UuVvWwXxYyZz

मध्ययुगात ही लिपी लॅटिनमधून तयार झालेल्या रोमान्स भाषा लिहिण्यासाठी वापरली गेली. यात सेल्टिक, जरमेनिक, बाल्टिक व काही स्लाव्हिक भाषांचा समावेश होतो. सध्या ही लिपी युरोपमधील बहुतांश भाषा लिहिण्यासाठी होतो.

लॅटिन वर्णमालेचा जगभरातील वापर
गडद हिरवा: फक्त लॅटिन वर्णमालेचा वापर
फिका हिरवा : लॅटिन व इतर लिप्यांचा वापर

युरोपीय वसाहतवाद आणि ख्रिश्चन धर्मप्रसाराबरोबर ही लिपी इतर खंडांत पसरली व ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थानेआफ्रिकेतील भाषा लिहिण्यासाठी ही लिपी वापरली जाऊ लागली. आता या भाषांमधील उतारे लिहिण्यासाठी पाश्चिमात्य लिपि-विद्वान आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धतीचाही आधार घेतात.