ल्यों


ल्यों (फ्रेंच: Lyon; Fr-Lyon.ogg उच्चार ; इंग्लिश: Lyons, लायान्झ) हे फ्रान्स देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (पॅरिस खालोखाल) शहर व महानगर आहे. हे शहर फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागातील रोन-आल्प प्रदेशाच्या रोन विभागात रोन नदीच्या काठावर वसले असून ते पॅरिसपासून ४७० किमी, मार्सेलपासून ३२० किमी तर जिनिव्हापासून १६० किमी अंतरावर स्थित आहे. २००८ साली ल्यों शहराची लोकसंख्या जवळजवळ ५ लाख तर शहरी भागाची लोकसंख्या १४.२२ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७.५७ लाख इतकी होती. रोन-आल्प प्रदेश व रोन विभाग ह्या दोन्हींची प्रशासकीय राजधानी ल्यों येथेच आहे.

ल्यों
Lyon
फ्रान्समधील शहर


ध्वज
चिन्ह
ल्यों is located in फ्रान्स
ल्यों
ल्यों
ल्योंचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 45°45′35″N 4°50′32″E / 45.75972°N 4.84222°E / 45.75972; 4.84222

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
विभाग रोन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ४३
क्षेत्रफळ ४७.९५ चौ. किमी (१८.५१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८९ फूट (२७ मी)
लोकसंख्या  (२००८)
  - शहर ४,८३,१८१
  - घनता १०,०७७ /चौ. किमी (२६,१०० /चौ. मैल)
  - महानगर १४,२२,३३१
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
lyon.fr

अनेक ऐतिहासिक वास्तू व इमारती असलेले ल्यों शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. सध्या ल्यों हे फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आर्थिक केंद्र असून येथे अनेक सॉफ्टवेर, बायोमेडिकल व औषधे बनवणाऱ्या कंपन्या तसेच अनेक बँका स्थित आहेत. २०१० साली नवनवे शोध लावणारे ल्यों हे फ्रान्समधील दुसरे तर जगातील ननव्या क्रमांकाचे शहर होते.

इंटरपोल ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे तसेच आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेचे मुख्यालय ल्यों येथेच आहे. ऑलिंपिक लॉन्नेस हा लीग १ मध्ये खेळणारा फ्रेंच फुटबॉल संघ ल्यों येथील स्थानिक संघ आहे.

इतिहास

भूगोल

शहररचना

वाहतूक

कला

शिक्षण

खेळ

अर्थव्यवस्था

जुळी शहरे

ल्यों युरोपाच्या परिषदेच्या आंतरसांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या शहरांपैकी एक आहे. ल्योंचे जगातील खालील शहरांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत.[१]

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: