फिफा कॉन्फेडरेशन्स चषक

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक ही एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. फिफाद्वारे आयोजीत केली जाणारी ही स्पर्धा सध्या दर चार वर्षांनी खेळवली जाते. ह्या स्पर्धेत जगातील सहा फुटबॉल महामंडळांमधून प्रत्येक एक संघ निवडला जातो. विद्यमान विश्वचषक विजेता तसेच आगामी विश्वचषक स्पर्धेचा यजमान देश ह्यांना ह्या स्पर्धेत आपोआप प्रवेश मिळतो. आशियामधून ए.एफ.सी. आशिया चषक विजेता, आफ्रिकेमधून आफ्रिका देशांचा चषक विजेता, उत्तर व मध्य अमेरिकेमधून कॉन्ककॅफ गोल्ड चषक विजेता, दक्षिण अमेरिकेमधून कोपा अमेरिका विजेता, ओशनियामधून ओ.एफ.सी. देशांचा चषक विजेता तर युरोपामधून युएफा यूरो विजेता देश कॉन्फडेरशन्स चषकासाठी पात्र ठरतात.

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक
खेळफुटबॉल
प्रारंभ१९९२
संघ
खंडआंतरराष्ट्रीय
सद्य विजेता संघब्राझीलचा ध्वज ब्राझील
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ

१९९२ साली सौदी अरेबियामध्ये किंग फहाद चषक ह्या नावाने ह्या स्पर्धेची सुरुवात झाली.

निकाल

किंग फहाद चषक

वर्षयजमानअंतिम सामनातिसऱ्या स्थानाचा सामना
विजेतास्कोरउप-विजेतातिसरे स्थानस्कोरचौथे स्थान
१९९२[१]  सौदी अरेबिया
आर्जेन्टिना
३–१
सौदी अरेबिया

अमेरिका
५–२
कोत द'ईवोआर
१९९५[१]  सौदी अरेबिया
डेन्मार्क
२–०
आर्जेन्टिना

मेक्सिको
१–१
(५–४ पेशू)

नायजेरिया

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक

वर्षयजमानअंतिम सामनातिसऱ्या स्थानाचा सामना
विजेतास्कोरउप-विजेतातिसरे स्थानस्कोरचौथे स्थान
१९९७  सौदी अरेबिया
ब्राझील
६–०
ऑस्ट्रेलिया

चेक प्रजासत्ताक
१–०
उरुग्वे
१९९९  मेक्सिको
मेक्सिको
४–३
ब्राझील

अमेरिका
२–०
सौदी अरेबिया
२००१  दक्षिण कोरिया


 जपान


फ्रान्स
१–०
जपान

ऑस्ट्रेलिया
१–०
ब्राझील
२००३  फ्रान्स
फ्रान्स
१–०
(सोनेरी गोल)

कामेरून

तुर्कस्तान
२–१
कोलंबिया
२००५  जर्मनी
ब्राझील
४–१
आर्जेन्टिना

जर्मनी
४–३
(अवे)

मेक्सिको
२००९  दक्षिण आफ्रिका
ब्राझील
३–२
अमेरिका

स्पेन
३–२
(अवे)

दक्षिण आफ्रिका
२०१३  ब्राझील
ब्राझील
३–०
स्पेन

इटली
२–२
(३–२ पेशू)

उरुग्वे

संदर्भ

बाह्य दुवे