फ्लोरेन्स


फिरेंत्से किंवा फ्लोरेन्स (इटालियन: Firenze, It-Firenze.ogg उच्चार ) ही इटली देशाच्या मधील तोस्काना प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्लोरेन्स शहराची लोकसंख्या सुमारे ३.७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १५ लाख आहे.

फिरेंत्से (फ्लोरेन्स)
Firenze
इटलीमधील शहर


चिन्ह
फिरेंत्से (फ्लोरेन्स) is located in इटली
फिरेंत्से (फ्लोरेन्स)
फिरेंत्से (फ्लोरेन्स)
फिरेंत्से (फ्लोरेन्स)चे इटलीमधील स्थान

गुणक: 43°47′N 11°15′E / 43.783°N 11.250°E / 43.783; 11.250

देश इटली ध्वज इटली
प्रदेश तोस्काना
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ८०
क्षेत्रफळ १०२.४ चौ. किमी (३९.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६४ फूट (५० मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,७०,७०२[१]
  - घनता ३,६२० /चौ. किमी (९,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.firenze.it

ऐतिहासिक काळापासून फ्लोरेन्स हे इटली व युरोपामधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले गेले आहे. विशेषतः मध्ययुगरानिसां काळांत चित्रकला, शिल्पकला व वास्तूशास्त्र ह्या विषयांमध्ये फ्लोरेन्सचे योगदान अमुल्य मानले जाते. सर्वानुमते रानिसांचा उगम फ्लोरेन्स येथेच झाला. मध्ययुगात व्यापार व अर्थकारणारे केंद्र असलेले फ्लोरेन्स हे त्या काळात जगातील सर्वात महत्त्वाच्या व श्रीमंत शहरांपैकी एक होते.[२][३] रानिसां दरम्यानच्या फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाची फ्लोरेन्स ही राजधानी होती.

येथील ऐतिहासिक वास्तूंमुळे फ्लोरेन्स हे जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले गेले आहे व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. फ्लोरेन्समध्ये अनेक कला दालने व संग्रहालये असून येथे दरवर्षी अंदाजे १५ लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात.

प्रेक्षणीय स्थळे

प्रसिद्ध रहिवासी

जुळी शहरे

जगातील खालील शहरांसोबत तोरिनोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[४]

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: