१९३६ उन्हाळी ऑलिंपिक


१९३६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती. ही स्पर्धा जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामध्ये ऑगस्ट १ ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ४९ देशांमधील ३,९६३ खेळाडूंनी भाग घेतला.

१९३६ उन्हाळी ऑलिंपिक
XI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
चित्र:1936 berlin logo.jpg
यजमान शहरबर्लिन
जर्मनी नाझी जर्मनी


सहभागी देश४९
सहभागी खेळाडू३,९६३
स्पर्धा१२९, १९ खेळात
समारंभ
उद्घाटनऑगस्ट १


सांगताऑगस्ट १६
अधिकृत उद्घाटकचान्सेलर अ‍ॅडॉल्फ हिटलर
मैदानऑलिंपिक मैदान


◄◄ १९३२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९४० ►►

नाझी जर्मनीमध्ये हिटलरच्या नेत्र्त्वाखाली सत्तेवर असलेल्या नाझी पक्षाने ह्या स्पर्धेत आर्यनेतर वर्णाच्या खेळाडूंना जर्मनीतर्फे खेळण्यास मज्जाव केला होता. नाझी पक्षाच्या ह्या व इतर अनेक उघड ज्यूविरोधी धोरणांमुळे अनेक देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला होता. अनेक देशांच्या ज्यू खेळाडूंनी येथे भाग घेण्यास नकार दिला होता. खेळाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह ब्रॉडकास्ट) करणारी ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

सहभागी देश

सहभागी देश

अफगाणिस्तान, बर्म्युडा, बोलिव्हिया, कोस्टा रिका, लिश्टनस्टाइनपेरू ह्या सहा देशांची ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती. स्पेनसोव्हिएत संघ ह्या देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता.

पदक तक्ता

 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
1 जर्मनी (यजमान)33263089
2 अमेरिका24201256
3 हंगेरी101516
4 इटली89522
5 फिनलंड76619
फ्रान्स76619
7 स्वीडन65920
8 जपान64818
9 नेदरलँड्स64717
10 युनायटेड किंग्डम47314

बाह्य दुवे