ॲरिझोना

अ‍ॅरिझोना (इंग्लिश: Arizona, En-us-Arizona.ogg उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात वसलेले अ‍ॅरिझोना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सहावे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १६व्या क्रमांकाचे राज्य आहे.

अ‍ॅरिझोना
Arizona
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
टोपणनाव: The Grand Canyon State,
The Copper State (ग्रांड कॅनियनचे राज्य, तांब्याचे राज्य)
ब्रीदवाक्य: Ditat Deus
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
रहिवासीअ‍ॅरिझोनियन
राजधानीफीनिक्स
मोठे शहरफीनिक्स
सर्वात मोठे महानगरफिनिक्स महानगरीय क्षेत्र
क्षेत्रफळ अमेरिकेत ६वा क्रमांक
 - एकूण२,९५,२५४ [१] किमी² (१,१३,९९८[१] मैल²)
  - रुंदी५०० किमी (३१० मैल)
  - लांबी६४५ किमी (४०० मैल)
 - % पाणी०.३२
  - अक्षांश३१°२०′ उ. to ३७° उ.
  - रेखांश१०९°०३′ प. to ११४°४९′ प.
लोकसंख्या अमेरिकेत १६वा क्रमांक
 - एकूण६३,३८,६६६ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता११७.३/किमी² (अमेरिकेत ३६वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न ४१,१७१ अमेरिकन डॉलर
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेशफेब्रुवारी १४, इ.स. १९१२ (४८वा क्रमांक)
प्रमाणवेळMountain: UTC-7
संक्षेपAZ  US-AZ
संकेतस्थळwww.az.gov

अ‍ॅरिझोनाच्या दक्षिणेला मेक्सिकोची सोनोराबाहा कॅलिफोर्निया ही राज्ये, पश्चिमेला कॅलिफोर्निया, वायव्येला नेव्हाडा, पूर्वेला न्यू मेक्सिको, उत्तरेला युटा तर ईशान्येला कॉलोराडो ही राज्ये आहेत. फीनिक्स ही अ‍ॅरिझोनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

अ‍ॅरिझोना १९१२ साली अमेरिकेचे ४८वे राज्य बनले. अमेरिकन संघात सामील झालेले संलग्न ४८ राज्यांमधील ते सर्वात शेवटचे राज्य आहे. सोनोराच्या वाळवंटात वसलेले हे राज्य आपल्या रुक्ष व उष्ण हवामानासाठी तसेच ग्रँड कॅन्यन व इतर अनेक राष्ट्रीय उद्याने, जंगले व वास्तूंकरिता प्रसिद्ध आहे.

मोठी शहरे

गॅलरी

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: