आशियाई खेळ

आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची एक पाल्य संस्था करते. ऑलिंपिक खेळांखालोखाल एशियाड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे १९५१ साली खेळवली गेली. आजवर नऊ देशांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे व एकूण ४६ देशांनी आपले खेळाडू पाठवले आहेत परंतु १९७४ मधील स्पर्धेनंतर इस्रायलवर सहभाग बंदी घालण्यात आली. सध्या आशियामधील सर्व ४५ देश ह्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिंपिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते. या स्पर्धेतील सर्व खेळांसाठी अनुक्रमे सुवर्णपदक, रजतपदक आणि कांस्यपदक अशी तीन पदके दिली जातात.

आशियाई स्पर्धेचा लोगो

खेळ

बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हॅंडबॉल, हॉकी, वॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, असे विविध खेळ या स्पर्धेत खेळले जातात.

स्पर्धांचा इतिहास

आशियाच्या नकाशावर यजमान देश व शहरे
वर्षस्पर्धायजमानतारखादेशखेळाडूखेळखेळ प्रकारसंदर्भ
१९५१
I
नवी दिल्ली, भारतमार्च ४ - ११११४८९५७[१]
१९५४
II
मनिला, फिलिपिन्समे ११९९७०७६[२]
१९५८
III
तोक्यो, जपानमे २८जून १161,8201397[३]
1962
IV
जकार्ता, इंडोनेशियाऑगस्ट २४सप्टेंबर ४121,4601388[४]
1966
V
बँकॉक, थायलंडडिसेंबर ९ - डिसेंबर २०161,94514143[५]
1970
VI
बँकॉक, थायलंडऑगस्ट २४ - सप्टेंबर ४162,40013135[६]
1974
VII
तेहरान, इराणसप्टेंबर १ - सप्टेंबर १६193,01016202[७]
1978
VIII
बँकॉक, थायलंडडिसेंबर ९ - डिसेंबर २०193,84219201[८]
1982
IX
नवी दिल्ली, भारतनोव्हेंबर १९ - डिसेंबर ४233,41121147[९]
1986
X
सोल, दक्षिण कोरियासप्टेंबर २० - ऑक्टोबर ५274,83925270[१०]
1990
XI
बीजिंग, चीनसप्टेंबर २२ - ऑक्टोबर ७366,12229310[११]
१९९४
XII
हिरोशिमा, जपानऑक्टोबर २ - ऑक्टोबर १६426,82834337[१२]
१९९८
XIII
बँकॉक, थायलंडडिसेंबर ६ - डिसेंबर २०४१६,५५४३६३७६[१३]
२००२
XIV
बुसान, दक्षिण कोरियासप्टेंबर २९ - ऑक्टोबर १४४४७,७११३८४१९[१४]
२००६
XV
दोहा, कतारडिसेंबर १ - डिसेंबर १५४५9,520३९424[१५]
२०१०
XVI
ग्वांग्झू, चीननोव्हेंबर १२ - नोव्हेंबर २७४५9,704४२४७६[१६]
२०१४
XVII
इंचॉन, दक्षिण कोरियासप्टेंबर १९ - ऑक्टोबर ४
२०१८
XVIII
जाकार्ता, इंडोनेशियाऑगस्ट १८ - सप्टेंबर ९या वर्षीची स्पर्धा

पदक तक्ता

देशस्पर्धासुवर्णरौप्यकांस्यएकूण
 अफगाणिस्तान150347
 ब्रुनेई816121240
 बांगलादेश71449
 ब्रुनेई60044
 कंबोडिया70235
 चीन1012048196082631
 हाँग काँग15244967140
 भारत16128168260556
 इंडोनेशिया1687116188391
 इराण13138143157438
 इराक65151838
 जपान169109138352658
 इस्रायल518161953
 जॉर्डन63131329
 कझाकस्तान4110119168397
 उत्तर कोरिया874109142325
 दक्षिण कोरिया156185286741820
 कुवेत1916182761
 किर्गिझस्तान53152240
 लाओस60167
 लेबेनॉन942511
 मकाओ6161421
 मलेशिया125173115239
 मंगोलिया10153368116
 म्यानमार1414275293
 नेपाळ8012122
 ओमान71034
 पाकिस्तान15374875160
 पॅलेस्टाईन60011
 फिलिपिन्स1662107195364
 कतार8272849104
 सौदी अरेबिया62181948
 सिंगापूर16324886166
 श्रीलंका1610101939
 सीरिया8971531
 चिनी ताइपेइ95882174314
 ताजिकिस्तान5321116
 थायलंड16109152204465
 तुर्कमेनिस्तान536514
 संयुक्त अरब अमिराती6311923
 उझबेकिस्तान5548291227
 व्हियेतनाम12124545102
 यमनचे प्रजासत्ताक40022
एकूण38713830451512216

^ २०१०मध्ये राजकीय लुडीबुडीमुळे कुवेतला निलंबित करण्यात आले होते.[१७]

एकही पदक न मिळालेले देश

देशस्पर्धा
 भूतान6
 मालदीव6
 पूर्व तिमोर3

संदर्भ

बाह्य दुवे