ऑलिंपिक

मुख्यालय: लौसन, स्वीज़लेंड

ऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरुवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.

ऑलिंपिक वर्तुळाचा गोफ:उंच अशा स्तंभावर एक भलामोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिंपिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. जणू पाच मित्रच हातांत हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते! ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे- 'सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस.' म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे; अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो.

ऑलिंपिक खेळांचे यजमान देश

उन्हाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.
हिवाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.
ऑलिंपिक यजमान शहरे[१]
वर्षउन्हाळी ऑलिंपिकहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
क्र.शहरक्र.शहर
१८९६ अथेन्स, ग्रीस
१९०० पॅरिस, फ्रान्स
१९०४ सेंट लुईस, मिसूरी(), अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९०६मध्य अथेन्स, ग्रीस
१९०८ लंडन, युनायटेड किंग्डम
१९१२ स्टॉकहोम, स्वीडन
१९१६ बर्लिन, जर्मनी
पहिल्या महायुद्धामुळे रद्द.
१९२० ॲंटवर्प, बेल्जियम
१९२४ पॅरिस, फ्रान्स शॅमोनी, ओत-साव्वा, फ्रान्स
१९२८ अ‍ॅम्स्टरडॅम, नेदरलँड्स सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
१९३२१० लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९३६११ बर्लिन, जर्मनी गार्मिश-पाटेनकर्शन, जर्मनी
१९४०१२ तोक्यो, जपान
हेलसिंकी, फिनलंड
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
सप्पोरो, जपान
सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
गार्मिश-पाटेनकर्शन, जर्मनी
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
१९४४१३ लंडन, युनायटेड किंग्डम
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो, इटली
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
१९४८१४ लंडन, युनायटेड किंग्डम सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
१९५२१५ हेलसिंकी, फिनलंड ओस्लो, नॉर्वे
१९५६१६ मेलबर्न, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया +
स्टॉकहोम, स्वीडन ()
कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो, इटली
१९६०१७ रोम, इटली लेक टाहो, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९६४१८ टोक्यो, जपान इन्सब्रुक, ऑस्ट्रिया
१९६८१९ मेक्सिको सिटी, मेक्सिको१० ग्रेनोबल, फ्रान्स
१९७२२० म्युनिक(), पश्चिम जर्मनी११ सप्पोरो, जपान
१९७६२१ मॉंत्रियाल, क्वेबेक, कॅनडा१२ इन्सब्रुक, ऑस्ट्रिया
१९८०२२ मॉस्को, सोव्हिएत संघ१३ लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९८४२३ लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने१४ सारायेव्हो, युगोस्लाव्हिया
१९८८२४ सोल, दक्षिण कोरिया१५ कॅल्गारी, आल्बर्टा, कॅनडा
१९९२२५ बार्सिलोना, स्पेन१६ आल्बर्तव्हिल, साव्वा, फ्रान्स
१९९४१७ लिलहामर, नॉर्वे
१९९६२६ अटलांटा, जॉर्जिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९९८१८ नागानो, जपान
२०००२७ सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया
२००२१९ सॉल्ट लेक सिटी, युटा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
२००४२८ अथेन्स, ग्रीस
२००६२० तोरिनो, इटली
२००८२९ बीजिंग(), चीन
२०१०२१ , व्हॅंकूव्हर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा
२०१२३० लंडन, युनायटेड किंग्डम
२०१४२२ सोत्शी, रशिया
२०१६३१ रियो दि जानेरो, ब्राझिल
२०१८२३ प्यॉंगचॅंग, दक्षिण कोरिया
आधी शिकागोला दिली गेलेली ही स्पर्धा सेंट लुईसला हलवण्यात आली.
काही खेळ स्टॉकहोममध्ये भरवले गेले.
काही खेळ हॉंग कॉंगमध्ये भरवले गेले.

संदर्भ

बाह्य दुवे

  • ऑलिंपिक अधिकृत संकेतस्थळ [१]